scorecardresearch

Video: कुस्ती नाही करोना लसीकरण… नावाड्याला लस देण्यासाठी कर्मचारी नदीकाठी पोहचले अन्…

समोर आलेल्या माहितीनुसार व्हिडीओ दिसणाऱ्या व्यक्तीबरोबर असणारी अन्य एक व्यक्ती लसी नको म्हणून थेट झाडावर जाऊन बसली.

Boatman refuses to take vaccine
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय

करोना लसीकरणादरम्यान लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देशातील वेगवेगळ्या भागांमधून वेगवेगळे अनुभव येत असल्याच्या बातम्या वेळोवेळी समोर येत असतात. लसीसंदर्भात असणारी भिती आणि गैरसमज यामुळे अनेकजण लस घेण्यास टाळाटाळ करताना दिसतात. ग्रामीण भागामध्ये काही जण झाडावर चढून बसतात तर काहीजण कर्मचाऱ्यांशी लस नको म्हणून भांडू लागलात. असाच एक प्रकार पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमधील बलियामधून समोर आलाय.

एएनआयने या संदर्भातील वृत्त दिलं असून एक व्हिडीओही शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये एका नावाड्याला करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी आरोग्य कर्मचारी नदीच्या काठी पोहचतात तेव्हा नावाडी त्यांच्याशी वाद घालू लागतो. मात्र नकार देऊनही कर्मचाऱ्यांकडून लस देण्याची बळजबरी होत असल्याचं पाहून ही व्यक्ती तिथून पळण्याचा प्रयत्न करु लागते.

नक्की वाचा >> प्रेयसीच्या आईचा जीव वाचवण्यासाठी त्याने दान केली किडनी; महिन्याभरानंतर प्रेयसीने दुसऱ्यासोबतच केलं लग्न

बऱ्याच प्रयत्नानंतर या व्यक्तीला आरोग्य कर्मचारी पकडताना व्हिडीओत दिसत आहे. तरीही ही व्यक्ती त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी धडपड करताना व्हिडीओत दिसतेय. हा व्हि्डीओ पाहून हे लसीकरण कमी आणि कुस्तीचा फड अधिक वाटत असल्याच्याही प्रतिक्रिया यावर काही जणांनी नोंदवल्यात.

नक्की वाचा >> शिकारीचा ‘हा’ ५७ सेकंदांचा Video पाहून आव्हाडही झाले थक्क; व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “Amazing Hunting”

हा नावाडी लस देण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना हात पाय मारुन स्वत:पासून दूर करण्याचा प्रयत्न करतोय. या व्हिडीओसोबत एएनआयने दिलेल्या माहितीनुसार व्हिडीओ दिसणाऱ्या व्यक्तीबरोबर असणारी अन्य एक व्यक्ती लसी नको म्हणून थेट झाडावर जाऊन बसली. यासंदर्भात रेवती येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्पष्टीकरण दिलं आहे. या दोन्ही व्यक्तींनी नंतर लस घेण्यासाठी होकार दिला आणि लस घेतली.

नक्की वाचा >> ‘पुष्पा.. पुष्पाराज.. एकटाच बसं समद्यांना..’; अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’चा मराठी ट्रेलर पाहिलात का?

यापूर्वीही हिंदी भाषिक राज्यांमध्ये असे प्रकार घडले आहेत. उत्तर प्रदेशबरोबरच बिहार, मध्य प्रदेशमध्येही असे प्रकार अनेकदा घडले आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका वृत्तानुसार मध्य प्रदेशमधील एक मुलगी लस नको म्हणून झाडावर चढून बसलेली. तिला झाडावरुन खाली उतरवताना आरोग्य कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Boatman refuses to take vaccine mishandles a health care worker scsg

ताज्या बातम्या