Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातून दोन दिवसांपूर्वी ३ जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता या तीनही व्यक्तींचा मृतदेह एका नदीत आढळून आले आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या तीनही व्यक्तींचे मृतदेह शनिवारी सुरक्षा दलाच्या जवानांना आढळून आले असून पुढील चौकशी सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाला जाताना हे तिघेजण बेपत्ता झाले होते. यानंतर त्यांचा तपास घेण्यात आला असता त्यांचे मृतदेह एका नदीत आढळून आले आहेत.

या तीनही व्यक्तींच्या मृत्यूमध्ये एका अल्पवयीन युवकाचाही समावेश आहे. योगेश (३२), दर्शन (४०) आणि वरुण (१४) हे तिघे चुलत भाऊ असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे. तसेच यांच्या मृत्यूमागे काही घातपात आहे की अजून काही? याचा तपास करण्यात येत आहे. तसेच या तिघांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली असावी, असा संशय व्यक्त करत आहेत. मात्र, याला तुर्तास तरी पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, एका अधिकाऱ्याने सांगितलं की, त्यांचे मृतदेह जम्मूमधील जिल्ह्यातून वाहणाऱ्या नदीत आढळून आले आहेत. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील मल्हारला हे तिघे जात होते. मात्र, त्यानंतर त्यांचा अचानक त्यांच्या कुटुंबाशी संपर्क तुटला. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. अतिरेक्यांनी त्यांचं अपहरण केलं असावं असा संशय असल्याने सुरक्षा दलांनी आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. विशेषतः या भागात आधीच अतिरेक्यांच्या हालचालींच्या बातम्या आल्या समोर आल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण केल्याचा संशय आल्याने भारतीय लष्कराच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी संयुक्त कारवाई सुरू केली. तसेच शुक्रवारी भाजपाचे आमदार सतेश शर्मा यांनीही जम्मू-काश्मीर विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला आणि या घटनेबाबत सरकारला अनेक सवाल केले. दरम्यान, बेपत्ता झालेल्यांपैकी एकाने आपल्या कुटुंबीयांना फोन करून सांगितलं होतं की ते डोंगरात आपला मार्ग हरवले आहेत. दरम्यान, आता या तिघांचा मृत्यू नेमकं कशामुळे झाला? याचं कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.