ब्रिटनच्या हिथ्रो विमानतळावर अलकायदा दहशतवादी संघटनेची दहशतवादी महिला आत्मघाती बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी मिळताच विमानतळाला सावधनतेचा इशारा देण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना. आता भारतातील मुख्य विमानतळांवर अशा प्रकारचे आत्मघाती बॉम्बस्फोट काही दहशतवादी संघटना घडवून आणणार असल्याची माहिती सुरक्षा विभागाने दिली आहे.
त्यानुसार भारतातील मुख्य विमानतळांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी महिला आपल्या स्तनांमध्ये स्फोटके लपवून बॉम्बस्फोट घडवून आणणार आहेत. त्यामुळे भारतीय विमानतळांवर महिला प्रवाशांची दोन वेळा सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच विमानतळावरील सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
सध्या भारतीय विमानतळांवर अजूनही अशा रितीने विस्फोटकांचाय शोध घेण्यासाठी संपूर्ण शरीर स्कॅनर्स यंत्रणाही उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. ही यंत्रणा प्रवाशांच्या गोपनीयतेशी संबंधित असल्याची कारणे देण्यात येत आहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या तपासणीवर सुरक्षेची सर्व मदार अवलंबून आहे.
ब्रिटनच्या हिथ्रो विमानतळाची, मात्र अशी स्थिती नाही या विमानतळावर विस्फोटकांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण शरिरयष्टी स्कॅन करणारी यंत्रणा आहे. अशी यंत्रणेचा भारतीय विमानतळांवर अभाव असल्याने केंद्रीय सुरक्षा दलला(सीआय़एसफ) सुरक्षेच्या मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
सीआयएसफचे अधिकारी म्हणाले की, “आम्ही अशा विस्फोटकांचा शोध घेण्यासाठीची पद्धत आणि यंत्रणा आणण्यावर काम करत आहोत. त्यासाठी आंतराष्ट्रीय स्तरावरील सुरक्षा संस्थांशी समन्वय साधून सबळ यंत्रणा तयार करण्यासाठीचे प्रयत्नही सुरू आहेत, परंतु अजूनपर्यंत कोणीही पूर्णपणे कडेकोट सुरक्षा तपासणी यंत्रणा तयार करण्यावर अंतिम उपाय शोधू शकलेले नाही.”