विकीलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजला अटक करण्यात आली आहे. इक्वेडोरच्या दुतावासातून त्याला अटक करण्यात आली आहे. आपली अटक टळावी या उद्देशाने असांज याच दुतावासात वास्तव्य करत होता. इक्वेडोरने त्याला देण्यास नकार दिला. त्यानंतर लंडन पोलिसांनी त्याला अटक केली. विविध देशांची, राजकारण्याची माहिती, कागदपत्रे, संभाषण असांजने जाहीर केले होते. त्यामुळे त्याला अटक व्हावी यासाठी अनेक मंडळी प्रयत्नात होती. आता त्याला अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असांजला अटक करण्यात आली असून त्याला वेस्टमिनिस्टर कोर्टापुढे हजर करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे. असांजने २०१० मध्ये अनेक गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक केली होती. आपली अटक टळावी म्हणून तो २०१२ पासून इक्वाडोर येथील दुतावासात वास्तव्य करत होता. १२ डिसेंबर २०१८ ला त्याला इक्वाडोरचे नागरिकत्व मिळाले होते.

इक्वाडोर सरकारने असांजला दिलेला आश्रय काढून घेतल्यानंतर लंडन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गुप्त कागदपत्रे आणि गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी विकीलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजला अटक करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: British police arrest wikileaks founder julian assange
First published on: 11-04-2019 at 15:36 IST