Mukhtar Ansari Convicted : बाहुबली नेता मुख्तार अंसारी आणि त्याचा मोठा भाऊ बसपा खासदार अफजाल अंसारी यांना अपहरण आणि हत्याप्रकरणात गाजीपूर न्यायालायने शिक्षा सुनावली आहे. गँगस्टर ॲक्टखाली मुख्तार अंसारीला दोषी ठरवून १० वर्षांची शिक्षा आणि ५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर, खासदार अफजल अंसारी यांना ४ वर्षांची शिक्षा आणि १ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बसपा खासदार अफजाल अंसारी आणि माजी आमदार मुख्तार अंसारी यांच्याविरोधात गँगस्टर ॲक्टप्रकरणात शनिवारी कोर्टाने शिक्षा सुनावली. कृष्णानंद राय हत्याकांडातील गँगस्टर प्रकरणात मुख्तार आणि अफजाल यांच्याविरोधात निकाल सुनावण्यात आला. खासदार अफजाल अंसारी यांना चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांची खासदारकी आता रद्द होऊ शकते. मुख्तार अंसारी आणि त्याचा भाऊ अफजाल अंसारी यांनी २००५ मध्ये गाजीपूर येथे भाजपा आमदार कृष्णानंद राय यांची हत्या केली होती. आरोपींना शिक्षा सुनावताच कृष्णानंद राय यांच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे. “माझा न्यायपालिकेवर विश्वास आहे. गुंड, माफियांचं राज्य आता समाप्त झालं आहे”, असं त्या म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाजीपूरच्या मुहम्मदाबाद पोलीस ठाणे क्षेत्रात बसनिया चट्टी येथे नोव्हेंबर २००५ ला तत्कालीन भाजपा आमदार कृष्णानंद राय यांच्यासह सात लोकांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात २००७ मध्ये गँगस्टर ॲक्टअंतर्गत अफजाल अंसारी, त्याचा भाऊ डॉन मुख्तार अंसारी आणि मेहुणा एजाजुल हक यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. एजाजुल हक यांचं निधन झालं आहे. याप्रकरणी आता उर्वरित दोघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.