नूतनीकरण सुरू असलेली इमारत कोसळून झालेल्या अपघातात चीनमधील हेनान प्रांतात १७ जणांचा मृत्यू झाला, तर २४ जण जखमी झाले, अशी माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली.
बैवादू शहरात १९९० मध्ये बांधण्यात आलेल्या या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना शुक्रवारी ती अचानकपणे कोसळली, अशी माहिती झिनुआ या वृत्तसंस्थेने दिली आहे. बचाव पथकाने ४० जणांना वाचविण्यात यश मिळविले असून सात जणांचा मृत्यू झाला तर २३ जण जखमी झाले आहेत. बचाव पथक आणखी दोन जणांचा शोध घेत आहे. या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Building collapse in china 17 dead
First published on: 01-11-2015 at 06:48 IST