माझा पासपोर्ट रद्द करून किंवा मला अटक करून बँकांना एकही पैसा मिळणार नाही, असे वक्तव्य उद्योगपती विजय मल्ल्या यांनी केले आहे. बँकांचे कर्ज फेडण्याची माझी तयारी आहे. त्यासाठी माझी बँकांशी सतत बोलणीही सुरू आहेत. मात्र हा व्यवहार रास्तपणे झाला पाहिजे. मला ही रक्कम फेडता आली पाहिजे आणि यापूर्वी झालेल्या कर्जफेडीच्या व्यवहरांप्रमाणे बँकांनाही हा सौदा मान्य असला पाहिजे, असे मल्ल्या यांनी सांगितले.
विजय मल्ल्यांची खासदारकी धोक्यात 
माझा पासपोर्ट रद्द करून किंवा मला अटक करून बँकांना एक पैसाही मिळणार नाही. मला भारत सोडण्यास भाग पाडण्यात आल. सध्या मल्ल्या ब्रिटनमध्ये असून ब्रिटन सोडण्याचा कोणताही इरादा नसल्याचेही मल्ल्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्याविरुद्ध जारी करण्यात आलेल्या अजामीनपात्र वॉरंटविषयी विचारण्यात आले असता मल्ल्या म्हणाले की, मला या हास्यास्पद आरोपांमुळे आजिबात दोषी वाटत नसल्याचे सांगितले.
संपत्तीची संपूर्ण माहिती बँकांना द्या, सुप्रीम कोर्टाचे विजय मल्ल्यांना आदेश