Byju’s Lays Off Marathi News बायजूस या कंपनीने २,५०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले आहे. २७ आणि २८ जून रोजी बायजूमधल्या १,५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकल होतं. स्टार्टअप्सच्या फंडिंगमध्ये घट झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना काढण्यात आले असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. तसेच भारतात दिवसेंदिवस शैक्षणिक मार्केट कमी होऊ लागल्यामुळे कंपनी तोट्यात असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा- मोठी बातमी! एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून निवड; उद्धव ठाकरेंच्या राजीमान्यावर दिली प्रतिक्रिया

२७ आणि २८ जून रोजी टॉपर आणि व्हाईटहॅट ज्युनियरमधून १५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले. या दोन्ही कंपन्या बायजूने गेल्या दोन वर्षांत विकत घेतल्या होत्या. यासोबतच, कंपनीने २९ जून रोजी सुमारे १००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यासंबंधी ई-मेल पाठवला आहे. सामग्री आणि डिझाइन टीमवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. टॉपर प्लॅटफॉर्मवरुन १२०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. तर ३०० ते ३५० कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले आहे, तर सुमारे ३०० कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच कंत्राटावर घेतलेल्या ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

हेही वाचा- ‘करोनाची साथ अजून संपली नाही, ११० देशांमध्ये करोना वाढला’, WHO चा धक्कादायक अहवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेल्स, मार्केटिंग, ऑपरेशन्स, कन्टेन्ट, डिझाईन अशा विविध विभागांमधून कर्मचारी कपात केली आहे. बायजूसने गेल्या वर्षी टॉपरला ५० दशलक्ष डॉलरमध्ये विकत घेतले होते. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांनी टॉपरच्या एकत्रीकरणाची सुमारे ८० टक्के कर्मचारी कायम ठेवले आहेत. तर उर्वरित कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. यापूर्वी व्हाईटहॅट ज्युनियरने सुमारे ३०० पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. ऑगस्ट २०२० मध्ये, बायजूसने ३०० दशलक्ष डॉलरमध्ये व्हाईटहॅट ज्युनियर कंपनी विकत घेतली होती. यापैकी ८० जण कंपनीच्या ब्राझील कार्यालयात काम करत होते. बायजूने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ब्राझीलमध्ये पदार्पण केले होते.