देशभरातील तीन लोकसभा तसेच २९ विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांची आज मतमोजणी सुरू आहे. १३ राज्यांमध्ये या पोटनिवडणुकांसाठी ३० ऑक्टोबरला मतदान पार पडले होते. दादरा नगर हवेलीतून शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर आघाडीवर आहेत. तर, पश्चिम बंगालमध्ये चार मतदार संघांपैकी गोसाबा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला असून इतर तीन जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. हरयाणाच्या एलेनाबाद विधानसभा मतदारसंघात अभय चौटाला यांनी आघाडी कायम ठेवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभेची जागा काँग्रेस उमेदवार प्रतिभा सिंग यांनी जिंकली आहे. मेघालयातील तिन्ही जागांवर सत्ताधारी पक्ष आघाडीवर आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत. आंध्र प्रदेशच्या बडवेलमध्ये मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचा पक्ष वायएसआर काँग्रेसचे उमेदवार तब्बल ९० हजार मतांनी आघाडीवर आहेत. राजस्थानच्या धारियावाड आणि वल्लभनगरमधून काँग्रेसचे नागराज मीना आणि प्रिती शेखावत यांनी आघाडी कायम राखली आहे. कर्नाटकच्या सिंदगीमध्ये भाजपा उमेदवार आघाडीवर असून हंगालमध्ये काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहे.

ममता बॅनर्जींची विजयानंतर प्रतिक्रिया…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सर्व चार जागा जिंकल्याचा दावा करत उमेदवारांचं अभिनंदन केलंय. “हा विजय जनतेचा विजय आहे, कारण बंगाल नेहमीच द्वेषाच्या राजकारणापेक्षा विकास आणि एकता निवडेल, हे दर्शवते,” असं ममता यांनी ट्विट करून म्हटलंय.

पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bypoll result update all over india hrc
First published on: 02-11-2021 at 14:50 IST