वॉशिंग्टन : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या विधिमंडळाने जातिभेदविरोधी विधेयकाला मंजुरी दिली आहे. जातिभेदाचे निर्मूलन करून राज्यातील वंचित समाजांचे रक्षण करण्याच्या हेतूने हे विधेयक तयार करण्यात आले आहे. या विधेयकाला सोमवारी मंजुरी देण्यात आल्यानंतर ते आता गव्हर्नर गॅव्हिन न्यूसोम यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल. भेदभावविरोधी कायद्यांत जातीचा समावेश संरक्षित श्रेणीत करणारे कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील पहिले राज्य ठरले आहे. हे विधेयक प्रथम स्टेट सिनेटर आयशा वहाब यांनी सादर केले होते.

हेही वाचा >>> पी. चिदम्बरम गृहविषयक संसदीय स्थायी समितीवर; नवीन फौजदारी कायद्यांसंबंधी अभ्यासामध्ये सहभाग

त्याला देशभरातील जातिसमानता मानवाधिकार कार्यकर्ते आणि संघटनांनी पाठिंबा दिला होता. विधेयकाला (एसबी ४०३) पाठिंबा दिलेल्या सर्व सिनेटरचे वहाब यांनी आभार मानले असून जातिभेदाचा सामना करणाऱ्या लोकांचे आम्ही रक्षण करीत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.   

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंदू संघटनेकडून निषेध अ कोअ‍ॅलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका (कोहना) या हिंदू संघटनेने हे विधेयक मंजूर झाल्याचा निषेध केला असून हा कॅलिफोर्नियाच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचे म्हटले आहे. या विधेयकानुसार राज्यातील समान नागरी हक्क कायदा, शिक्षण आणि गृहनिर्माण संहिता यांच्यात सुधारणा करून वंशावळी अंतर्गत जातीचा समावेश संरक्षित श्रेणी म्हणून करण्यात आला आहे. हे विधेयक अमेरिकेतील हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी आहे, असा आरोप कोहनाने केला आहे.