परदेशात स्थलांतर करू इच्छिणाऱ्यांमध्ये कॅनडा सर्वात लोकप्रिय देश असल्याचं म्हटलं जातं. भारतातूनही कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर केलं जातं. मात्र, आता कॅनडात स्थलांतरविरोधी भावना वाढल्याची माहिती एका सर्वेक्षणामधून समोर आली आहे. लेजर फॉर असोसिएशन ऑफ कॅनेडियन स्टडीजच्या अलीकडच्या एका सर्वेक्षणानुसार, ६० टक्के प्रतिसादकर्त्यांना असं वाटलं की, खूप जास्त स्थलांतरित आहेत, यामध्ये स्थलांतरितांमध्ये फेब्रुवारीपासून १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सर्वेक्षणामधून समोर आलेल्या माहितीनुसार, कॅनडात भारतीय आणि शीख समुदायांना लक्ष्य केलं जात आहे. कॅनडात कायमच इमिग्रेशनच्या विरोधात भावना वाढत आहेत. भारतीयींना आणि विशेषतः शीखांना लक्ष्य करणाऱ्या आणि परदेशी लोकांना नापसंत करणाऱ्या भावना वाढत आहेत. सर्वेक्षणातील माहितीनुसार, मार्च २०१९ मध्ये ही संख्या ३५ टक्क्यांवर होती. तेव्हा ४९ टक्क्यांना योग्य प्रमाणात स्थलांतरित येत असल्याचे वाटले. मात्र, नंतरचा आकडा २८ टक्क्यांवर आला आहे. लेजर फॉर असोसिएशन ऑफ कॅनेडियनच्या म्हणण्यांनुसार, इमिग्रेशनला विरोध करण्याची ही पातळी या शतकातील सर्वात जास्त आहे. दरम्यान, यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे.

हेही वाचा : फक्त स्मार्टफोन्सच्या सहाय्यानं ८० कोटी भारतीय गरिबीतून बाहेर; संयुक्त राष्ट्रांचा कौतुकाचा वर्षाव

दरम्यान, भारतीय हे स्थलांतरितांचे सर्वात मोठे समूह आहेत. त्यामध्ये मग ते कायमचे रहिवासी असोत किंवा अभ्यास परवान्यासारख्या तात्पुरत्या व्हिसावर आलेले असोत. पण त्यांच्यामध्ये शीख सर्वात जास्त दिसतात. कारण ते दिसायला वेगळे आहेत. त्यामुळे मागील महिन्यांत एकट्या ओंटारियो प्रांतामध्ये सर्वाधिक वर्णद्वेषी शारिरीक हल्ले झाले आहेत. तर पीटरबरो शहरात घडलेल्या एका घटनेला स्थानिक पोलिसांनी द्वेषी अपराध म्हणून वर्गीकृत केलं आहे.

पीटरबरोच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जुलैच्या पहाटे चार तरुण एका व्यक्तीवर थुंकले आणि त्याची पगडी कापण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली असून हल्ले वाढले आहेत. आता कोलंबियामधील क्वांटलेन पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीमधील राज्यशास्त्राचे प्राध्यापक शिंदर पुरेवाल यांनी सांगितलं की, “मजेची गोष्ट म्हणजे कॅनडामध्ये इमिग्रेशनविरोधी भावनांचं कारण बदललं आहे. ते म्हणतात की, जगातील लोक आमच्या नोकऱ्या काढून घेण्यासाठी कॅनडाला येत आहेत. आता स्थलांतरित, विशेषतः विद्यार्थी हे अब्जावधी डॉलर्स आणत आहेत. त्यामुळे तक्रार अशी आहे की, त्यांच्या पैशांमुळे तेथील किंमती वाढल्या आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत डॉ.सतविंदर कौर बैंस यांनाही चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटलं की, “या क्षणी आम्ही सहकारी लोकांबद्दल चुकीच्या माहितीच्या रूपात वर्णद्वेष पाहत आहोत. शीख आणि इतर दृश्यमान स्थलांतरित समुदाय कॅनडामध्ये स्थिर असलेला एक भाग आहेत. त्यामुळे ते इमिग्रेशन कॅनडासाठी वाईट आहे. आमच्या समुदायांमध्ये प्रचलित असलेल्या विदेशी लोकांना न पसंत करणं हा कॅनेडियन लोकांच्या प्रतिसादाचा अभाव आहे.” दरम्यान, स्पेन्सर फर्नांडो सारख्या राजकीय समालोचकांनी याचं वर्णन हा राग चुकीचा असल्याचं वर्णन केलं आहे.