मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये एक थरारक गुन्हेगारी नाट्य उलगडल्याचे पाहायला मिळाले. या घटनेत लोकायुक्तांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अभियंता जी. पी. मेहरा यांच्या घरावर छापे टाकले. या छाप्यात विभागाला प्रचंड मोठं घबाड सापडलं आहे. सुरूवातीला केवळ बेहिशोबी मालमत्तेचा शोध घेण्यासाठी सुरू झालेल्या या कारवाईने लवकरच असे काही वळण घेतले आणि यामध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्या पाहून अनेकांना धक्का बसेल.
या अभियंत्याच्या घरात प्रचंड पैसा सापडला, तो मोजण्यासाठी अनेक मशिन्स मागवाव्या लागल्या, याबरोबरच ३ कोटींहून अधिक किमतीचे काही किलो सोने आणि चांदी देखील सापडली. पण सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे या अभियंत्याच्या घरात चक्क १७ टन इतका मध आढळून आला, जो त्यांच्या फार्महाऊसवर व्यवस्थित साठवून ठेवला होता.
नेमकं काय झालं?
भोपाल आणि नरदापूरम येथे पहाटेच्या वेळी लोकायुक्तचे चार डीएसपी दर्जाचे पोलीसांनी अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. चार वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या या कारवाईत थरारक माहिती समोर आली.
मेहरा यांच्या मणिपूरम कॉलनीतील आलिशान घरात अधिकाऱ्यांना ८.७९ लाख रुपये रोख, सुमारे ५० लाख रूपयांचे दागिने आणि ५६ लाख रुपयांचे फिक्स डिपॉझिट आढळून आले. पण घरं घबाड हे त्यांच्या दुसऱ्या घरात सापडलं. दाणा पाणीजवळच्या ओपल रीजन्सीमध्ये त्यांचे एक आलिशान अपार्टमेंट आहे, जिथे अधिकाऱ्यांना सोन्याचा मोठा साठा सापडला. येथे २६ लाख रुपये रोख, ३.०५ कोटी रुपये किमतीचे २.६ किलोग्राम सोने आणि ५.५ किलोग्राम चांदी, अधिकाऱ्यांनी जप्त केली.
पण सर्वात धक्कादायक शोध हा मेहरा यांच्या फार्महाऊसवर लागला. हे फार्महाऊस सोहगपूर तहसिल (नर्मदापूरम) येथील सैनी गावात आहे. येथे अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे असेट्स सापडले, ज्यामध्ये १७ टन मध, सहा ट्रॅक्टर, बांधकाम सुरू असलेल्या ३२ कॉटेज, ७ बांधून पूर्ण झालेले कॉटेज, एक मस्य शेतीची व्यवस्था करण्यात आलेले खाजगी तळे आढळून आले. इतकेच नाही तर एक गाईंचा गोठा, एक मंदिर आणि अनेक लक्झरी कार ज्यामध्ये फोर्ड एन्डेव्हर, स्कॉडा स्लाव्हिया, किआ सोनेट आणि मारूती सियाझ या वाहनांचा समावेश आहे, या सर्व गाड्या मेहरा यांच्या कुटुंबाच्या नावावर आहेत.
यानंतऱ पुढील कारवाई ही गोविंदपूरा इंडस्ट्रिज भागात करण्यात आली, येथे मेहरा यांचा व्यवसाय चालत असे असे सांगितले जात आहे. येथे अधिकाऱ्यांना अवजारे, कच्चा माल आणि १.२५ लाख रुपये रोख सापडले. तसेच मेहराचे नातेवाईक हे या कंपनीत पार्टनर असल्याची कागदपत्रेही आढळून आली.
दिवसाच्या अखेरीस ३६,०४ लाख रूपये रोख, २.६४९ किलो सोने, ५.५२३ किलो चांदी, फिक्स्ड डिपॉझिट्स, इन्शुरन्स पॉलिसीज, शेयर कागदपत्रे, अनेक मालमत्ता आणि चार लक्झरी कार आढळून आल्या. लोकायुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या मालमत्तेची किंमत अद्यापही मोजली जात आहे आणि ती काही कोटींमध्ये जाऊ शकते.
दरम्यान, जप्त केलेले दस्तऐवज, डिजिटल फाइल्स आणि बँकिंग रेकॉर्ड तपासण्यासाठी फॉरेन्सिक पथक बोलवण्यात आले आहे, तर मेहरा यांच्या बेनामी गुंतवणुकीचा शोध घेण्यासाठी त्यांच्या आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत.