भ्रष्टाचारविरोधात विशेष मोहिमेचा भाग म्हणून सीबीआयने देशभरातील १५० विविध सरकारी संस्थांच्या कार्यालयांवर अचानक छापेमारी केली. संभाव्य भ्रष्टाचाराच्या तपासणीसाठी या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
देशभरातील ज्या शहरांमध्ये सीबीआयने छापेमारी केली आहे त्यामध्ये दिल्ली, जयपूर, जोधपूर, गुवाहाटी, श्रीनगर, शिलाँग, चंदीगड, शिमला, चेन्नई, मदुराई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू, मुंबई, पुणे, गांधीनगर, गोवा, भोपाळ, जबलपूर, नागपूर, पाटणा, रांची, गाझियाबाद, डेहराडून आणि लखनऊ या शहारांचा समावेश आहे.
The joint surprise checks were conducted in Delhi, Jaipur, Jodhpur, Guwahati, Srinagar, Shillong, Chandigarh, Shimla, Chennai, Madurai, Kolkata, Hyderabad, Bengaluru, Mumbai, Pune, Gandhinagar, Goa, Bhopal, Jabalpur, Nagpur, Patna, Ranchi, Ghaziabad, Dehradun and Lucknow.
— ANI (@ANI) August 30, 2019
या शहरांमधील ज्या सरकारी कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली ती अशी कार्यालये आहेत जिथे सर्वसामान्य नागरिक किंवा छोट्या व्यावसायिकांना व्यवस्थेतील भ्रष्ट कारभारामुळे सर्वात जास्त नुकसान भोगावे लागते.