इशरत प्रकरणी सीबीआयच्या प्रमुखांचे आधी विधान, नंतर इन्कार
इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणाच्या आरोपपत्रात भाजपचे नेते अमित शहा यांचे आरोपी म्हणून नाव समाविष्ट करण्यात आले असते तर यूपीए सरकारला आनंद झाला असता, असे विधान सीबीआयचे प्रमुख रणजित सिन्हा यांनी केल्याने नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. मात्र रणजित सिन्हा यांनी, अशा प्रकारचे वक्तव्य केल्याचा सपशेल इन्कार केला आहे.
रणजित सिन्हा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे वृत्त दिल्लीतील एका दैनिकात प्रकाशित झाले. या प्रकरणात अमित शहा यांची दोनदा चौकशी करण्यात आली. मात्र त्यामध्ये त्यांच्याविरोधात कोणताही पुरावा मिळाला नाही. आम्ही पुराव्यांच्या आधारेच आरोपपत्र तयार केले आहे, असे सिन्हा यांनी म्हटल्याचे एका व्यापारविषयक दैनिकात त्यांचा हवाला देऊन म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Feb 2014 रोजी प्रकाशित
‘..तर युपीएला आनंदच झाला असता’
इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणाच्या आरोपपत्रात भाजपचे नेते अमित शहा यांचे आरोपी म्हणून नाव समाविष्ट करण्यात आले असते तर यूपीए सरकारला आनंद झाला असता, असे विधान सीबीआयचे प्रमुख रणजित सिन्हा यांनी केल्याने नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
First published on: 09-02-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi director ranjit sinha courts controversy again upa wouldve been happy had we charged amit shah