पीटीआय, नवी दिल्ली 

न्यायमूर्ती नियुक्तीबाबत होणाऱ्या विलंबाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर कठोर ताशेरे ओढल्यानंतर  ज्येष्ठ वकील सोमशेखर सुंदरेसन यांची गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली.

सुंदरेसन यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने सुमारे दहा महिन्यांपूर्वी केंद्राला केली होती. केंद्रीय विधिमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सुंदरेसन यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा ‘एक्स’ समाजमाध्यमावर केली. न्यायमूर्तीची नियुक्ती आणि बदल्यांबाबत केंद्र सरकारने ‘पसंती’चे धोरण अवलंबल्याबद्दल काही दिवसांपूर्वी न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती.

हेही वाचा >>>काँग्रेसकडून गुर्जरांचा अपमान! पंतप्रधान मोदींचा आरोप

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने २०२१मध्ये सुंदरेसन यांच्या नियुक्तीची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाकडे केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने २०२२ मध्ये त्यांच्या नावीची शिफारस केंद्राकडे केली होती. परंतु अ‍ॅड. सुंदरेसन यांनी विविध समस्यांबद्दल समाज माध्यमांवर आपली मते मांडल्याने त्यांच्या नावाचा पुनर्विचार करावा, अशी भूमिका केंद्राने घेतली होती.

प्रलंबित नियुक्त्या 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्ली उच्च न्यायालयात अ‍ॅड. सौरभ किरपाल, कलकत्ता उच्च न्यायालयात अमिताभ बॅनर्जी आणि शाक्य सेन तसेच मद्रास उच्च न्यायालयात जॉन सत्यन यांच्या नियुक्तीची शिफारस केंद्र सरकारकडे अद्याप प्रलंबित आहे.