आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-वंचित आघाडी यांच्या युतीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात सोमवारी चर्चा झाली. काही विषयांवर अद्याप विचारविनिमय सुरु आहे. पण, लवकरच अंतिम निर्णय होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहे. त्या शक्तीला मी भीमशक्ती मानत नाही. कारण, सगळी शक्ती माझ्याबरोबर असून, ती वंचित शक्ती आहे. परंतु, मी सध्या मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांबरोबर असल्याने शिवशक्ती आणि भीमशक्ती याठिकाणी आहे. दुसऱ्या शिवशक्ती आणि भीमशक्तीचा विषयच येत नाही, असे रामदास आठवले यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं.

हेही वाचा : “१९८६च्या आंदोलनात शरद पवारांनी लाठ्या खाल्या, पण…”; मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला टोला

“प्रकाश आंबेडकर जरी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले. तरी आमच्या राजकारणावर फारसा फरक पडणार नाही. कारण दलित समाज हा मोठ्याप्रमाणात माझ्याबरोबर आहे. मी रिपब्लिकन पक्षाचे नाव टिकवून ठेवलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांपासून मी फारकत घेतली नाही. राजकारणात एकट्या पक्षाने निवडून येत नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीबरोबर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असेही रामदास आठवले यांनी म्हटलं.

हेही वाचा : ‘नेभळट सरकार’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना CM शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले “मला आक्रमक, धाडसपणा शिकवू नका, ४० दिवस…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडीबरोबर प्रकाश आंबडेकर जात असतील, तर काय सल्ला देणार या प्रश्नावर रामदास आठवले म्हणाले, “युती झाल्यास त्यांचं किती पटणार हे माहिती नाही. कारण, प्रकाश आंबेडकर चर्चेचा बसल्यावर जास्तीच्या जागांची मागणी करतात आणि अनेकवेळा निर्णय होत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीबरोबर जातात का हा प्रश्न आमच्यासमोर आहे. त्यांच्या जाण्याने आमच्या राजकारणावर काही फरक पडणार नाही. तसेच, प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाबरोबर येण्यास हरकत नाही,” असेही रामदास आठवले यांनी सांगितलं.