ओबेरॉय समूहाचे मानद अध्यक्ष पृथ्वीराज सिंग ओबेरॉय (पीआरएस ओबेरॉय) यांचं मंगळवारी सकाळी निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. पीआरएस ओबेरॉय यांनी भारतातील हॉटेल व्यवसायाला नवी दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. देशात हॉटेल व्यावसायाचा चेहरामोहरा बदलण्याचं श्रेय पीआरएस ओबेरॉय यांना दिलं जातं.

ओबेरॉय यांनी २०२२ मध्ये EIH लिमिटेडचे ​​कार्यकारी अध्यक्ष आणि EIH असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेडचे ​​अध्यक्षपद सोडले. २००८ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

EIH लिमिटेडचे माजी कार्यकारी अध्यक्ष, ओबेरॉय ग्रुप फ्लॅगशिप, भारतातील हॉटेल व्यवसायाचा चेहरामोहरा बदलणारा माणूस म्हणून पीआरएस ओबेरॉय यांना ओळखलं जातं. “अनेक देशांमधील आलिशाम हॉटेल्सच्या व्यवस्थापनासाठी नेतृत्व पुरवण्याव्यतिरिक्त, पीआरएस ओबेरॉय यांनी ‘ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स’च्या विकासात पुढाकार घेतला.