सीमांध्रवासीयांच्या प्रश्नाबाबत सुमारे आठवडय़ाभराच्या उपोषणानंतर रुग्णशय्येवर असलेल्या तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी रुग्णालयातून बाहेर पडताच काँग्रेसवर हल्लाबोल केला आह़े  आंध्र प्रदेशचे विभाजन चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप करीत त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे आणि आता सीमांध्रवासीयांना हैदराबादच्या भविष्याची चिंता असल्याचेही त्यांनी म्हटले आह़े
‘आंध्र प्रदेशात आंदोलन सुरू आह़े  सीमांध्रवासीयांना शिक्षण, रोजगार, महसुलाची विभागणी, पाणी वाटप आणि हैदराबादचे भविष्य आदींची काळजी असल्याचे चंद्राबाबू यांनी म्हटले आह़े  येथील राममनोहर लोहिया रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होत़े