भारत आणि चिनी सैन्यात सिक्किम सीमेवरील डोक्लाममध्ये दोन महिन्यांपासून जोरदार संघर्ष सुरु आहे. भारत आणि चीनमधील तणाव वाढला असताना पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. याशिवाय पाकिस्तानकडून अनेकदा घुसखोरीचे प्रयत्नदेखील सुरु आहेत. एका बाजूला पाकिस्तानी सैन्याकडून आक्रमक भाषा वापरली जात असताना, दुसरीकडे मोदी सरकारच्या अण्वस्त्र धोरणातील बदलांमुळे पाकिस्तानच्या थिंक टँकला चिंता मोठी सतावते आहे. पाकिस्तानच्या ‘डॉन’ या वृत्तपत्राने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

‘भारताने अण्वस्त्र धोरणात केलेले बदल पाकिस्तानसाठी धोकादायक ठरु शकतात,’ असे डॉनने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या लेखात म्हटले आहे. सेंटर फॉर इंटरनॅशनल स्ट्रॅटर्जिक स्टडीजने (सीआयसीसी) भारताच्या अण्वस्त्र धोरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सीआयसीसीमध्ये भारताच्या बदलत्या अण्वस्त्र धोरणाविषयी चर्चा झाली. थिंक टँक सीआयसीसीमधील सर्वच सदस्यांनी चर्चेदरम्यान भारताच्या बदललेल्या अण्वस्त्र धोरणाबद्दल भीती बोलून दाखवली.

A 19-year-old girl, Ayesha Rashid
…फिर भी दिल है हिंदुस्तानी! पाकिस्तानमधील १९ वर्षीय आयेशावर भारतात यशस्वी हृदयरोपण शस्त्रक्रिया!
miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
india military attaches
आफ्रिकन देशांमध्ये भारत डिफेन्स अटॅची का तैनात करत आहे? त्यांचे नेमके कार्य काय?
Saudi Arabia and india
काश्मीरच्या समस्येवर सौदी अरेबियानं स्पष्ट केली भूमिका, दिली भारताला साथ

भारताकडून अण्वस्त्रांची ताकद वाढवली जात असल्याच्या मुद्यावर पाकिस्तानमधील सर्वच सुरक्षा तज्ज्ञांचे एकमत झाले. ‘भारताच्या बदलल्या भूमिकेचा पाकिस्तावर मोठा परिणाम होईल. भारताकडून अण्वस्त्र क्षमता वाढवली जात असल्याने भविष्यात दोन्ही देशांमध्ये संवाद होण्याची शक्यता अतिशय धूसर होईल,’ असे पाकिस्तानच्या थिंक टँकचे मत आहे. पाकिस्तानच्या थिंक टँककडून कराचीमध्ये चर्चा करण्यात आली. अण्वस्त्र सज्जतेबद्दलच्या धोरणात भारताने केलेला बदल पाकिस्तानसाठी अतिशय धोकादायक असल्याचे मत यावेळी अनेक तज्ज्ञांनी वारंवार व्यक्त केले.

‘भारतीय अधिकारी आणि जाणकारांच्या विधानांवरुन मोदी सरकारने अण्वस्त्रांबद्दलच्या धोरणात बदल केल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अण्वस्त्रांचा वापर करण्याची सुरुवात आपण करायची नाही, अशी आधी भारताची भूमिका होती. मात्र आता भारताने ‘प्री एम्पटिव्ह स्ट्राईक्स’च्या पर्यायाचा विचार सुरु केला आहे. यामुळे पाकिस्तानला मोठा धोका निर्माण झाला आहे,’ असे पाकिस्तानी थिंक टँकचे मत आहे. ‘नव्या धोरणामुळे भारत शत्रूराष्ट्राच्या आक्रमणाची वाट न पाहता थेट हल्ला करेल. यामुळे भारताच्या शत्रूराष्ट्राच्या क्षमतेवर परिणाम होईल आणि त्यांना पूर्ण क्षमतेने प्रतिहल्ला करता येणार नाही,’ अशी भीती थिंक टँककडून व्यक्त करण्यात आली.