पेट्रोल-डिझेलवरील करांमध्ये कपात न करणाऱ्या बिगर-भाजपशासित राज्य सरकारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. या राज्यांमध्ये इंधन दर अधिक आहेत.  सहा महिने वाया गेले पण, आता तरी करकपात करून लोकांना दिलासा द्यावा, असे आवाहन मोदी यांनी केले. मोदींनी करोना आढावा बैठकीमध्ये उपस्थित केलेल्या इंधन दरवाढीच्या या मुद्द्यावरुन आता वादाचा भडका उडाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या संदर्भात नाराजी व्यक्त केल्यानंतर आता छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीमध्ये या बैठकीसंदर्भात वक्तव्य केलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी करोना आढावा बैठकीमध्ये मोदींनी दिलेल्या इंधनावरील कर कमी करण्याच्या सल्ल्याचा समाचार घेतला. “३८ टक्के भारत सरकारच्या तिजोरीमध्ये भर घालतो. त्यात आम्हाला किती परत मिळतोय चार ते पाच टक्के.
त्यांच्याकडे जवळजवळ २७-२८ हजार कोटी आहेत,” असं छगन भुजबळ म्हणाले. पुढे बोलताना भुजबळांनी इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झाले तेव्हा सरकारने दर कमी केले नाही याची आठवण करुन दिली. “जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर कमी झाले. तेव्हा भाजपा सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले नाही ते वाढत राहिले. जेव्हा जास्त होते तेव्हा काँग्रेसने भाव कमी ठेवलेले. तेव्हाही ते आरडाओरड करत होते. मागच्या काही काळात भाव कमी झाल्यावर सुद्धा भाजपा सरकारनं भाव वाढवले. २७ लाख कोटी रुपये कमवले,” असं भुजबळ म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal slams modi for corona meeting fuel discussion scsg
First published on: 29-04-2022 at 19:33 IST