छत्तीसगढ येथे एका धक्कादायक घटना समोर आली आहे. दुर्ग जिल्ह्यात महिलेने आपल्या पतीचा ओढणीने गळा आवळून खून केला आहे. मद्यप्राशन करून पती मारहाण करायचा. याच त्रासाला कंटाळून पत्नीने पतीचा खून केल्याचं समोर आलं आहे. यानंतर महिला किचनमध्ये ओढणी जाळत होती. तेव्हाच कुटुंबातील एका मुलाने पाहिलं आणि बिंग फुटलं आहे.

ही घटना दुर्ग जिल्ह्याच्या सुपेला थाना परिसरातील कृष्णा नगर येथे घडली आहे. येथे मृत दिलीप सोनी हे पत्नी संगीता हीच्यासह राहत होते. अलीकडील काही दिवसांपासून दिलीप सोनी मद्यप्रशान करून घरात वाद घालायचा. यामुळेच संगीताने दिलीप याचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून केला. यानंतर मृतदेह बेडवर तसाच सोडून संगीता ओढणी जाळत होती.

हेही वाचा : आधी डेटिंग अ‍ॅपवर ओळख, नंतर भेट आणि मग थेट बलात्काराचा आरोप; २७ वर्षीय बिनिता कुमारीला अटक, मोठ्या रॅकेटचा संशय!

मृत दिलीप याचा मोठा भाऊ जितेंद्र सोनीने सांगितल की, “जेवल्यानंतर विश्रांती घेत होतो. तेव्हाच रात्री ११.४५ वाजता भाचा ओरडत आला आणि आग लागल्याची माहिती त्याने दिली. यानंतर आम्ही सर्वांनी पाहिलं तर दिलीप याचा मृतदेह बेडवर पडला होता. याची माहिती तातडीने पोलिसांना दिली.”

घटनास्थळी पोहचल्यावर पोलिसांनी संगीताची चौकशी केली. तेव्हा, संगीताने उडवा-उडवीची उत्तरे दिली. पण, पोलिसांनी खाक्या दाखवताच संगीताने खून केल्याचं कबूल केलं. “गेल्या काही दिवसांपासून पती मद्यप्राशन करत शिव्या देत मारहाण करायचा. या त्रासाला कंटाळूनच पतीचा ओढणीने गळा आवळून खून केला,” असं संगीताने पोलिसांना सांगितलं.

हेही वाचा : मोबाईलवरून पती-पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण, वाद विकोपाला गेला अन्…; धक्कादायक घटना समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस अधिकारी संजय कुमार ध्रव यांनी म्हटलं की, “पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बेडवर त्यांना मृतदेह आढळला. यानंतर तातडीने दिलीपला रुग्णालयात दाखल केलं होतं. पण, येथे डॉक्टरने त्यास मृत घोषित केलं. आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली.”