scorecardresearch

चीनने सीमेवर केलेल्या कारवाया चिथावणीखोर, अमेरिका सरकारचे निरीक्षण

भारत-चीन सीमेवर चीनने केलेल्या कारवाया या चिथावणी देणाऱ्या असल्याचे निरीक्षण अमेरिका सरकारने नोंदवले आहे.

dv china america flag

वॉशिंग्टन : India China Border conflict भारत-चीन सीमेवर चीनने केलेल्या कारवाया या चिथावणी देणाऱ्या असल्याचे निरीक्षण अमेरिका सरकारने नोंदवले आहे. त्याच वेळी यासंदर्भात संयुक्त राष्ट्रे भारतासोबत अधिक निकट असल्याची हमीही व्हाईट हाऊस अधिकाऱ्यांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे उप सहाय्यक आणि ‘हिंदू-प्रशांत’साठीचे समन्वयक कर्ट कॅम्पबेल यांनी वॉशिंग्टन स्थित सल्लागार गटाशी बोलताना गुरुवारी ही माहिती दिली. भारत हा संयुक्त राष्ट्रांचा मित्र नाही आणि तो पुढेही नसेल याचा अर्थ असा नाही की आम्ही भारताचे भागीदार नाही.

भारताशी आम्ही अनेक गोष्टी पुरवू शकतो. यासाठी जागतिक पातळीवरील महान राष्ट्र म्हणून भारताची क्षमता ओळखण्याची गरज आहे. त्यासाठी  भारताच्या मागे भक्कमपणे उभे आहोत. त्यासाठी एकमेकांमधील विश्वास  अधिक दृढ करण्यावरआम्हाला भर द्यावा लागेल. २१व्या शतकातील भारत-अमेरिका यांच्यातील परस्पर संबंध अधिक मजबूत करणे ही अमेरिकेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले. अमेरिकेच्या नव्या सुरक्षा केंद्राने सादर केलेल्या एका अहवालात भारत-चीन सीमेवर चीन सैनिकांकडून झालेल्या आगळीकीमुळे  दोन्ही देशांमध्ये संघर्ष वाढीस लागल्याचे निरीक्षण या केंद्राने नोंदवले आहे. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या