चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाने कहर केला असून लॉकडाउन लावण्याची वेळ ओढावली आहे. दरम्यान एकीकडे अनेक देश करोनाच्या विळख्यातून बाहेर पडत असताना चीनने मात्र जगाची चिंता वाढवली आहे. याचं कारण म्हणजे चीनमध्ये करोनाचा नवा उपप्रकार आढळला आहे. हा उपप्रकार ओमायक्रॉन व्हेरियंटचा आहे. यामुळे चीनमध्ये एका दिवसात १३ हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळल्याचं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.

ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार, शांघाईपासून ७० किमीपेक्षा कमी अंतरावर असलेल्या शहरातील सौम्य लक्षणं असणाऱ्या एका करोना रुग्णापासून हा नवा उपपक्रार विकसित झाल्याचा अंदाज आहे. सिक्वेंसिंग डेटा आणि स्थानिक आरोग्य प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे सांगण्यात आलं आहे. दरम्यान अहवालात म्हटलं आहे की उपप्रकार चीनमधील करोना किंवा GISAI, जिथे जगभरातील शास्त्रज्ञ उत्परिवर्तनांचे निरीक्षण करण्यासाठी त्यांनी सिक्वेसन्स केलेला करोना व्हायरस शेअर करतात त्यांच्याकडे सादर केलेल्या इतर करोना व्हायरसशी जुळत नाही.

उत्तर चीनमधील डालियान शहरात शुक्रवारी नोंदवण्यात आलेल एक एक प्रकरणदेखील देशांतर्गत आढळलेल्या कोणत्याही करोना व्हायरसशी जुळत नाही, अशी माहिती पालिकेने WeChat वर दिली आहे. शनिवारी देशभरात नोंदवलेल्या आलेली जवळपास १२ हजार प्रकरणं कोणतीही लक्षणं नसणारी असल्याचं सांगण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान देशातील स्थिती पुन्हा एकदा नियंत्रणात आणावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शाघाईमध्ये नेमक्या काय उपाययोजना केल्या जात आहेत हे पाहण्यासाठी वरिष्ठ मंत्र्यांनी भेट दिली. आर्थिक केंद्र असणाऱ्या शांघाईत सध्या परिस्थिती अनियंत्रित आहेत. शनिवारी एकूण ८ हजार रुग्ण आढळले असून यामध्ये ७७८८ लक्षणं नसणारे होते. सोमवारपासून मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरु करण्यात आल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.