लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याचा मुलगा हाफिज तलाह सईद याला दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव भारत आणि अमेरिकेने संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत ठेवला होता. हा प्रस्ताव तांत्रिक कारण देत चीनने स्थगित केला आहे. विशेष म्हणजे एक दिवसाआधीच चीनने संयुक्त राष्ट्रात लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) दहशतवादी शाहीद महमूद याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव रोखला आहे. त्यानंतर आता पुन्हा चीन दहशतवाद्यांची पाठराखण करताना दिसत आहे.

‘पीएफआय’च नव्हे तर जगाला धडकी भरवणाऱ्या ‘अल कायदा’सह ‘या’ ४२ संघटनांवर भारतात बंदी, जाणून घ्या संपूर्ण यादी…

पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांना जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या भारत आणि अमेरिकेच्या प्रयत्नांना गेल्या दोन दिवसात दुसऱ्यांदा चीनने आडकाठी केली आहे. ‘१२६७ अल कायदा प्रतिबंध समिती’च्या नियमांनुसार दहशतवाद्यांना काळ्या यादीत टाकण्यास चीनने गेल्या चार महिन्यात पाचव्यांदा विरोध दर्शवला आहे.

विश्लेषण: चुंबकीय बॉम्ब म्हणजे काय? काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून वारंवार त्याचा वापर का केला जातो?

४६ वर्षीय हाफिज तलाह सईद लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा महत्त्वाचा कुख्यात नेता आहे. दहशतवादी संघटनेच्या मौलवी शाखेचा तो प्रमुख आहे. “हाफिज तलाह सईद हा दहशतवाद्यांची भरती, निधी संकलन आणि भारत, अफगाणिस्तानवर हल्ल्यांचे नियोजन करण्यात आघाडीवर होता” असे निवेदन भारताच्या गृह मंत्रालयाने एप्रिलमध्ये जारी केले होते. हा दहशतवादी पाकिस्तानातील एलईटीच्या तळांना सक्रीयपणे भेटी देत होता आणि भारत, इस्रायल, अमेरिकेसह भारतीय हितसंबंध असलेल्या पाश्चिमात्य देशांविरोधात जिहादची योजना आखत होता, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

जम्मू-काश्मीर : पोलिसांच्या ताब्यातील ‘हायब्रीड’ दहशतवादी ठार; मेहबुबा मुफ्तींनी व्यक्त केला संताप, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, एलईटीचा अन्य दहशतवादी शाहीद महमूद पाकिस्तानच्या कराचीतील आहे. २००७ पासून तो या दहशतवादी संघटनेत कार्यरत आहे. जून २०१५ ते जून २०१६ या काळात महमूद एलईटीच्या ‘फलाह-ए-इन्सानियत’ या संस्थेचा उपाध्यक्ष होता. या संस्थेकडून दहशतवादी संघटनेसाठी निधी गोळा करण्यात येतो.