पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरमधील शोपियांमध्ये दहशतवाद विरोधी पथक मोहीम राबवत असताना अटक झालेल्या लश्कर ए तोयबाच्या एका ‘हायब्रीड’ दहशतवादी ठार झाल्याच्या घटनेवरून संताप व्यक्त केला असून, या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे.

विश्लेषण : जम्मू-काश्मीरमध्ये कारवाया करणारे ‘हायब्रीड दहशतवादी’ नेमके आहेत तरी कोण? इतर दहशतवाद्यांपेक्षा हे वेगळे कसे ठरतात?

love jihad, Bhayander, Woman arrested,
लव्ह जिहादची धमकी देऊन मागितली ३० लाखांची खंडणी, भाईंदरमध्ये महिलेला अटक
abhishek banerjee challenges amit shah
“हिंमत असेल तर माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा”, ममता बॅनर्जींच्या पुतण्याचे अमित शाह यांना आव्हान; म्हणाले, “जी व्यक्ती…”
Congress Leader Kamalnath Promised Giving Article 370 Masjid Place But Real Video Is Different
“३७० लागू करू, मशिदीला जागा देऊ..”, काँग्रेसच्या बड्या नेत्याचं मुस्लिमांना आश्वासन? Video तील वाक्य आधी नीट ऐका
Dindori lok sabha election 2024, Communist Party of India (Marxist), jiva pandu gavit
दिंडोरीत कार्यकर्त्यांच्या दबावामुळे माकप उमेदवार उभा करणार

या ‘हायब्रीड’ दहशतवाद्याचा मृत्यू जवान आणि दहशतवाद्यांच्या चकमकीदरम्यान एक अन्य दहशतवाद्याची गोळी लागल्याने झाला. यानंतर मेहबुबा मुफ्ती यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, काश्मीर पंडीत आणि मजुरांची हत्या निंदनीय आहे, मात्र पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या आरोपीची दहशतवाद्यांकडून ठार होणे, यावरून असे दिसते की हा एक ‘पकडा आणि ठार करा’ या पॉलिसीचा भाग होता.

मेहबुबा म्हणाल्या, अशी पॉलिसी पहिले पंजाबमध्ये वापरली गेली होती. असं वाटत आहे की गुजरात आणि हिमाचलमध्ये निवडणूक जवळ आल्यामुळेच काश्मीर घाटीमधील शांतता भंग करण्याचे प्रयत्न होत आहेत. म्हणजे भाजपाल हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणाचा जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल. इमरान गनी याला मंगळवारी पहाटे शोपिया जिल्ह्यातील हरमेन येथून उत्तर प्रदेशातील मजुरांच्या हत्येमधील कथित सहभागाच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शोपिंया जिल्ह्यामधील नौगाम भागात पोलिसांकडून दहशतवाद विरोधी अभियान राबवले जात असताना, बुधवारी पहाटे दहशतवाद्यांकडू झालेल्या गोळीबारात गनी मारला गेला. काश्मीर झोनच्या पोलिसांनी बुधवारी ट्वीट करून सांगितले की, अटक झालेला हायब्रीड दहशतवाद्याच्या खुलाशाच्या आधारावर पोलीस आणि जवानांकडून छापेमारी सुरू असताना, शोपियांमधील नौगाम येथे दहशतवादी आणि पोलिसांची चकमक झाली, ज्यामध्ये हायब्रीड दहशतवादी इमरान बशीर गनी हा एका अन्य दहशतवाद्याकडून झालेल्या गोळीबारात मारला गेला.

तर मेहबुबा मुफ्ती यांनी पोलिसांच्या या दाव्यावर प्रश्न उपस्थित केला आहे, पोलिसांच्या ताब्यात असतानाही दुसरे दहशतवादी बशीर गनीला मारण्याच यशस्वी झाले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. जर दहशतवादी पोलिसांच्या ताब्यातील एखाद्यााल इतक्या सहजतेने मारू शकतात, तर विचार करा सामान्य माणसाची काय गत होईल.असंही त्या म्हणाल्या.