संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पुलवामा हल्ल्याचा सुत्रधार जैश-ए-महंम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात चीनने पुन्हा एकदा आडकाठी घालण्याचे संकेत दिले आहेत. या प्रस्तावावर अंतिम निर्णय येण्यापूर्वीच चीनने एका पत्रकार परिषदेत मसूद विरोधात भक्कम आणि स्विकारार्ह पुरावे भारताने द्यावेत असे म्हटले आहे. माध्यमांनी यासंदर्भात वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आज (दि.१३) अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन प्रस्ताव आणणार आहे. यावेळी या विषयांवर इतर सदस्य देशांकडे यावर सूचना मागवण्यात येणार आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या १२६७ समितीनुसार, २७ फेब्रुवारी रोजी फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेद्वारे मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, मी हे पुन्हा सांगतो की, चीन आपली जबाबदार भुमिका कायम ठेवणार आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या १२६७ समितीच्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहे. याबाबत सर्व सदस्य देशांना स्विकारार्ह असतील आणि ज्याद्वारे समस्येवर तोडगा निघेल असे पुरावे असायला हवेत.

चीन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मतांची ताकद असलेला सदस्य देश आहे. त्यामुळे चीनच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण, चीनने यापूर्वीही मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्याच्या प्रयत्नांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinas sign of backlash demanded proof against masood azhar to india
First published on: 13-03-2019 at 16:32 IST