आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात चिनी कोबीची लागवड यशस्वी झाली असून त्यात कोबीला चांगली पानेही आली आहेत असे नासाने म्हटले आहे.

अवकाश स्थानकातील अंतराळवीरांनी अजून कोबीचे सेवन केलेले नाही. चिनी प्रकारातील टोकियो बेकाना नावाची ही कोबीची प्रजाती असून ती अवकाशवीर पेगी व्हिटसन यांनी वाढवली आहे. थोडी कोबी खाण्यासाठी वापरली जाणार असून बाकीची नासाच्या केनेडी अवकाश केंद्रात अभ्यासासाठी परत पाठवली जाणार आहे. अवकाश स्थानकात वाढवलेले हे पाचवे पीक आहे.

mumbai coastal road marathi news, mumbai coastal road project
महाकाय तुळई समुद्रात स्थापन, मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची जोडणी यशस्वी
pune airport latest marathi news
पुणे ठरले उणे! आंतरराष्ट्रीय उड्डाणात छोट्या शहरांनीही टाकले मागे; जाणून घ्या स्थान…
Raigad, Private bus caught fire,
रायगड – मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर खाजगी बसला भीषण आग
Mumbai airport, Take-off and landing,
महत्त्वाचे : मुंबई विमानतळावर ९ मे ला टेकऑफ – लँडिंग तब्बल सहा तास बंद रहाणार, वाचा सविस्तर…

चिनी कोबी प्रथमच वाढवण्यात आली असून पाने असलेल्या भाज्यांचे अवकाशातील गुणधर्म तपासण्याचा त्यात हेतू आहे, या भाज्यांमध्ये पोषणमूल्येही वाढवता येणार आहेत. नासाच्या जॉनसन स्पेस सेंटरच्या स्पेस फूड सिस्टीम्स टीमने काही स्वयंसेवक गोळा केले असून ते या भाजीचा स्वाद घेणार आहेत.

टोकियो बेकाना ही कोबीची चांगली प्रजाती असून खगोल वैज्ञानिक नेहमी असे सांगतात की, अवकाशात त्यांच्या जिभेवरील रूची कलिका काम करीत नाहीत त्यामुळे ते नेहमी सॉस, मध व सॉय सॉस हे चवीसाठी वापरतात.

गुरुत्व कमी असलेल्या परिस्थितीत अवकाशवीरांच्या शरीरातील अर्धद्रव हे पायाकडे न जाता सगळीकडे पसरतात. पृथ्वीवर हे अर्धद्रव पायाकडे जात असतात. ताजी चिनी कोबी जरी वापरली तरी त्यांच्या रुचिकलिका उद्दिपीत झाल्या नाहीत तर त्यावर टाकण्यासाठी वेगळे पदार्थ रांच ड्रेसिंगच्या स्वरूपात पाठवले जाणार आहेत.

आता आणखी एक भाजी अवकाशात वाढीसाठी पाठवली जाणार आहे, अवकाश स्थानकात त्यामुळे बगीचाच तयार होणार आहे. पुढील काळात अरबिडॉप्सिस ही सपुष्प वनस्पती पाठवण्यात येणार आहे. जनुकीय कारणास्तव ती महत्त्वाची आहे.

अवकाशात वनस्पती कसे जुळवून घेतात यावर त्यामुळे प्रकाश पडेल असे फ्लोरिडा विद्यापीठाच्या प्रमुख संशोधक डॉ. अ‍ॅना लिसा पॉल यांनी सांगितले. भाज्यांची लागवड ही आगामी मोहिमांमध्ये अवकाशवीरांना ताजे अन्न उपलब्ध करण्यासाठी महत्त्वाची आहे.