दक्षिण चीन सागरातील पेचप्रसंगानंतर व्हिएतनाममध्ये उसळलेल्या दंगलीत २१ चिनी लोक मारले गेल्यानंतर आता शेकडो चिनी कामगारांना जहाजाने मायदेशी आणले जात आहे. एक हजार प्रवासी क्षमतेची दोन जहाजे सोमवारी सकाळी व्हुंग अँग बंदरावर आली. त्यातील एक जहाज कामगारांना घेऊन काही तासांनी माघारी निघाले.
अनेक कामगार जहाजावर चढताना दिसत होते असे असोसिएटेड प्रेसच्या बातमीदाराने सांगितले. व्हुंग अँग बंदर हे हनोईच्या दक्षिणेला ३५० कि.मी अंतरावर असून बुधवारी व गुरुवारी तैवानी स्टील मिल संकुलात काम करणाऱ्या कामगारांवर चीनविरोधी जमावाने हल्ला केला त्यात दोन चिनी कामगार ठार तर १४० जण जखमी झाले. जमावाने या संकुलास आग लावली.
लिन्ह यांनी सांगितले की, या संकुलात तीन हजार चिनी कामगार काम करीत होते. व्हिएतनाम व चीन यांच्यात संघर्ष सुरू असून चीनने एक मे रोजी एक तेलवाहू जहाज दक्षिण चिनी सागरात पाठवले त्याला व्हिएतनामने विरोध केला.  व्हिएतनाम आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात असून अमेरिकेने चीनची कृती प्रक्षोभक असल्याचे म्हटले आहे.