बिहारमध्ये सध्या लोकजनशक्ती पार्टीत जोरदार घडामोडी सुरू असल्याचे दिसत आहे. पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी पक्षनेते चिराग पासवान यांच्याविरोधात बंड करून, त्यांचे काका पशूपती कुमार पारस यांची नेतेपदी निवड केली असून, आता चिराग पासवान यांना लोकजनशक्ती पार्टीच्या अध्यक्षपदावरूनही हटववण्यात आलं आहे. त्यामुळे चिराग पासवानसाठी या घडामोडी अतिशय धक्कादायक ठरत आहेत.

चिराग पासवान यांच्या जागी सूरजभान यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. सूरजभान हे पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड प्रक्रिया संपन्न करतील. पाच दिवसांच्या आत राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलावून नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. या अगोदर चिराग पासवान यांना पक्षाच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आलं होतं.

लोकजनशक्ती पक्षाच्या पाच खासदारांचे बंड

लोकजनशक्ती पक्षाच्या (एलजीपी) बंडखोर खासदारांनी नेतेपदी निवड केलेले पशूपतीकुमार पारस हे पक्षनेते चिराग पासवान यांचे वडील आणि लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू आहेत.

तर, या सर्व धक्कादायक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चिराग पासवान यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या ट्विटसोबत त्यांनी एक जुनं पत्र देखील जोडलेलं आहे.

चिराग पासवान यांना धक्का; पशुपति पारस यांची लोकसभा पक्ष नेतेपदी अधिकृतरित्या वर्णी

वडिलांनी बनवलेला हा पक्ष आणि आपलं कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी मी प्रयत्न केले, मात्र अयशस्वी ठरलो. पक्ष आई समान आहे आणि आईला धोका नाही दिला पाहिजे. लोकाशाहीत जनताच सर्वकाही आहे, पक्षावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना मी धन्यवाद देतो. एक जुनं पत्र सार्वजनिक करतो आहे. असं चिराग यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोक जनशक्ति पार्टीतील अंतर्गत कलहामुळे चिराग पासवान यांना फटका बसला आहे. लोक जनशक्ति पार्टीच्या पाच बंडखोर खासदारांची मागणी सभापतींनी स्वीकारली आहे. त्यामुळे चिराग पासवान यांचं लोकसभेतील संसदीय पक्षाचं नेतेपद गेलं आहे. आपल्या वेगळा गट म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी पाच खासदारांनी केली होती.