कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मुलगा मौलाना झाल्यानंतर आता दाउदचा खास हस्तक मानला जाणाऱ्या छोटा शकीलचा मुलगाही अध्यात्माच्या वाटेवर निघाला आहे. बाप “गुन्हाओके देवता” तर मुले मात्र “अल्लाह के बंदे” असं परस्परविरोधी चित्र दिसत असल्याने आता दाउद आणि छोटा शकील नंतर त्यांची गादी कोण चालवणार? मुंबईच्या आणि विदेशातील बेकायदेशीर उद्योगांचा धनी कोण? असा प्रश्न दाउद आणि छोटा शकील यांच्यासमोर उभा राहिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे पोलिसांनी इक्बाल कासकरला खंडणीच्या केसमध्ये अटक केल्यानंतर दाऊदचा मुलगा हा अध्यात्मिक शिक्षण घेऊन प्रचार आणि प्रसार करण्यासाठी इजेत्तमा मध्ये सहभागी झाला आहे. तो मौलवी झाल्याने काही दिवस दाउद हा नैराश्येत गेला होता. दरम्यान आता तीच पाळी छोटा शकीलवरही येऊन ठेपली आहे. त्याचा मुलगा हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ असलेल्या कुराणच्या पठणात अव्वल असून तोही अध्यात्माकडे वळला आहे. दाऊद आणि छोटा शकील हे मुंबई बॉम्बस्फोटांनंतर परांगदा झाले व पाकिस्तानच्या आश्रयाला गेले आणि तेथेच स्थायिक झाले आहेत. दाउद याच्या कुटुंबात अनेक मुले आहेत. मात्र अंडरवर्ल्ड सांभाळण्यासाठी एकही त्या पात्रतेचा नाही. तर छोटा शकील याला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यापैकी एकुलता एक असलेला मुलगा मोबाशीर शेख (वय 18) सध्या शिकत आहे. मात्र मोबाशीरने डॉन म्हणून कुख्यात असलेल्या वडिलांचा रक्तरंजित प्रवास खंडित करीत अध्यात्माची कास धरली असून मौलवी होणं स्वीकारलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chota shakeels son also to become maulana like dawoods son
First published on: 25-08-2018 at 07:02 IST