Good news: ‘सिप्रेमी’ करोनावर प्रभावी ठरणारं आणखी एक औषध भारतात होणार उपलब्ध

ग्लेनमार्कचं फॅबीफ्ल्यू औषधही करोनावर परिणामकारक

भारतातील औषध निर्माण क्षेत्रातील आघाडीची कंपनी सिप्लाने ‘सिप्रेमी’ हे औषध लाँच करत असल्याची घोषणा केली आहे. ‘सिप्रेमी’ हे करोना व्हायरसवर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचे जेनेरिक व्हर्जन आहे. भारतात रेमडेसिवीर हे औषध सिप्रेमी या ब्रँण्डनेमखाली उपलब्ध होणार आहे.

ग्लेनमार्कच्य फॅबीफ्ल्यू आणि हिटेरोज कोविफॉर पाठोपाठ आता सिप्रेमी हे अ‍ॅंटिव्हायरल औषध सुद्धा करोनावरील उपचारासाठी उपब्ध होणार आहे. मागच्या आठवडयात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने इर्मजन्सीमध्ये रेमडेसिवीर हे औषध वापरायला परवानगी दिली.

भारताच्या औषधी महानियंत्रक विभागानं या रेमडेसिवीर औषधाच्या उत्पादनासाठी हेटेरो आणि सिप्ला या दोन कंपन्यांना परवानगी दिली आहे. अमेरिकेत करोना रुग्णांवर उपचारामध्ये रेमडेसिवीर हे औषध प्रभावी ठरल्याचे दिसले आहे.

भारतात करोना रुग्णांची संख्या चार लाखाच्या पुढे गेली आहे. सिप्रेमीची भारतात किती किंमत असेल ते अजून सिप्लाने जाहीर केलेले नाही. हे औषध कसे द्यायचे त्यासंबंधी सिप्ला प्रशिक्षणही देणार आहे. रेमडेसिवीरचे जेनेरिक व्हर्जन आणत असल्याचे जाहीर केल्यानंतर सिप्लाच्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी वाढ झाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ciplas antiviral drug cipremi joins fabiflu dmp

ताज्या बातम्या