कोलकाता येथील इंडियन म्युझियममध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबाळ केल्याची घटना घडली. इंडियन म्युझियमच्या सीआयएसएफ बॅरकजवळ हा गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. ए.के. मिश्रा असे गोळीबार करणाऱ्या जवानाचे नाव असून तो सीआयएफमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल आहे.

गोळीबार करणारा जवान ए.के. मिश्रा याला कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा- काबूलमध्ये भीषण बॉम्बस्फोट, आठ जणांचा मृत्यू तर २० हून अधिक जखमी

एका जवानाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार कोलकात्यातील इंडियन म्युझियमच्या सुरक्षेसाठी तैणात असेलल्या सीआयएसएफ जवान मिश्रा यांनी अचानक आपल्या सहकाऱ्यांवर एके ४७ रायफलने गोळीबार केला. या गोळीबारात सीआयएसएफचे सहाय्यक उपनिरीक्षक रणजीत कुमार सरानी यांचा मृत्यू झाला असून सहाय्यक कमांडंट सुवीर घोष जखमी झाले.

हेही वाचा- क्युबात वीज कोसळून थेट ऑईल डेपोला आग, ८० जखमी, १७ बेपत्ता

पोलिसांकडून जवानाची चौकशी सुरू

गोळीबाळ झाल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मिश्रा यांनी एके ४७ रायफलमधून २० ते २५ राऊंड फायरिंग केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर कोलकाता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मिश्रा यांना ताब्यात घेतलं आहे. मात्र, त्यांनी हा गोळीबार क केला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नसून जवानाची पोलिसांकडून चौकशी केली जात असल्याची माहिती कोलकाता पोलीस आयुक्त व्ही. के. गोयल यांनी दिली.