सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज इंग्रजी भाषेतून चालतं, पण न्यायालयाचे दरवाजे ठोठावणाऱ्या प्रत्येकालाच इंग्रजी बोलता येत असेल वा जाण असं होतं नाही. अशा वेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांनीच इंग्रजीबद्दल प्रश्न केला तर? अशाच एका घटनेचा प्रत्यय सर्वोच्च न्यायालयाच्या एका खटल्यातील सुनावणी दरम्यान आला. यात महत्त्वाचं म्हणजे फिर्यादीला इंग्रजी येत नसल्याचं माहिती झाल्यानंतर सरन्यायाधीशांनी तेलगू आणि इंग्रजीतून सुनावणी घेतली.

सर्वोच्च न्यायालयात देशभरातून दाखल होणाऱ्या खटल्यावर सुनावणी होते. निकाल दिले जातात. त्यामुळे बहुतांश वेळा प्रादेशिक भाषेची जाण असणाऱ्या याचिकाकर्त्यांना इंग्रजी येत नाही. असंच एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी आलं. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठाकडेच हे प्रकरण वर्ग झालं.

सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला इंग्रजीतून सुनावणी केली तर चालेल का? म्हणजे इंग्रजी कळत का? अशी विचारणा केली. त्यावर आपल्याला थोडं इंग्रजी कळतं असं याचिकर्त्याने सरन्यायाधीशांना सांगितलं. त्यानंतर सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला तेलगूमधून प्रकरण समजून सांगितलं. इतकंच नाही, तर याचिककर्त्याला तेलगू आणि इंग्रजी असे समिश्र भाषेतून प्रश्न विचारले.