गाझियाबाद : दिल्ली व उत्तर प्रदेशच्या सीमेवर गाझीपूर येथे भाजपचे कार्यकर्ते आणि कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये बुधवारी चकमक झाली.

प्रामुख्याने भारतीय किसान युनियनचा समावेश असलेले आंदोलक नोव्हेंबर २०२० पासून तळ ठोकून आहेत, तेथील उड्डाणपुलावरून भाजप कार्यकर्त्यांनी काढलेल्या मिरवणुकीदरम्यान ही चकमक झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन्ही बाजू दुपारी १२ वाजताच्या सुमारास दिल्ली- मेरठ एक्सप्रेस वे वर एकमेकांनजीक आल्यानंतर त्यांच्यात चकमक उडाली. यात त्यांनी लाठ्यांचा वापर केल्यामळे काहीजण जखमी झाले. भाजपचे नेते अमित वाल्मीकी यांच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या ताफ्यात असलेल्या काही वाहनांचे यात नुकसान झाले. ते दर्शवणाऱ्या चित्रफिती, छायाचित्रे समाज माध्यमांवर फिरली.