पीटीआय, नवी दिल्ली : २००२ सालच्या गुजरात दंगलींनंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘राजधर्माबाबतच्या’ वक्तव्याचा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी उल्लेख केल्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांशी त्यांची शाब्दिक चकमक झडली. खरगे हे ‘ सोयीस्कररीत्या’ माजी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा संदर्भ देत असल्याचा आरोप केला.

 ‘‘मी अटलबिहारी वाजपेयीजी यांचे वचन उद्धृत करतो. जातीय दंगलींमुळे जगभरात भारताची प्रतिमा डागाळली असल्याचे त्यांनी अहमदाबादमध्ये म्हटले होते. हे मी नव्हे, तर अटलजी म्हणाले होते. मी कुठल्या तोंडाने विदेशात जाईन, राजधर्माचे पालन झालेले नाही असे त्यांनी म्हटले होते’’, असे खरगे यांनी त्यांच्या भाषणात नमूद केले.

 सभागृहाचे नेते आणि वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी खरगे यांच्या विधानाला तत्काळ उत्तर दिले. काँग्रेसच्या कारकीर्दीत झालेल्या दंगलींमुळे- मग त्या महाराष्ट्रातील असोत, भागलपूरमधील किंवा गुजरातमधील- वाजपेयी व्यथित झाले होते, असे ते म्हणाले. ‘‘ते (तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी) राजधर्माचे पालन करत आहेत या वाक्याने वाजपेयी यांचे वक्तव्य संपले होते’’, असे सांगून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही या वेळी हस्तक्षेप केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संसदेत नरेंद्र मोदी यांचे विशेष जाकीट

नवी दिल्ली : प्लास्टिकच्या बाटल्यांवर पुनप्र्रक्रिया (रिसायकल) करून बनवलेल्या साहित्यापासून तयार केलेले बिनबाह्यांचे जाकीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संसदेत परिधान केले होते. पंतप्रधान बुधवारी सकाळी राज्यसभेत बसले असता त्यांनी फिक्या निळय़ा रंगाचे ‘सादरी’ जाकीट घातल्याचे दिसत होते.