महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला आहे. राहुल कनाल यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. राहुल कनाल यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल अशा तिघांचे फोटो हे टाइम्स स्क्वेअरवर झळकले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे राज्यासह देशभरात पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा सुरु झाली आहे.

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कनाल यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राहुल कनाल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो टाइम्स स्क्वेअरवर झळकले आहेत. टाइम्स स्क्वेअरवर फोटो झळकलेले एकनाथ शिंदे हे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी ही बातमी दिली आहे.

८ फेब्रुवारी २०२३ ला टाइम्स स्क्वेअरवर झळकले एकनाथ शिंदे यांचे बॅनर

एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस ९ फेब्रुवारीला झाला. त्याआधी ८ फेब्रुवारीच्या दिवशीही न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देणारा बॅनर हाती घेतला होता. त्या बॅनरचीही चांगलीच चर्चा झाली होती.

ठाण्यातील युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांच्या काही मित्रांनी मिळून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस टाईम्स स्क्वेअर येथे साजरा करण्याचा निर्णय घेतला. यात अभिनव जैन, राजीव पंड्या, रूचिता जैन या तरूणांचा समावेश आहे. हे सर्व कामानिमित्त न्यू यॉर्क येथे आहेत. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त टाईम्स स्क्वेअर येथे जाऊन केक कापला आणि हा दिवस साजरा केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदेंबद्दल आपली भावना व्यक्त करताना ते म्हणाले, “मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदेंनी अत्यंत कमी वेळात धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरात राहणाऱ्या मराठी अमराठी माणसांच्या हृदयात एकनाथ शिंदे यांनी आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच त्यांचा वाढदिवस न्यू यॉर्क येथे साजरा करण्याचा निर्णय घेतला.” असं या सगळ्यांनी सांगितलं.