Kristen Cabot Files For Divorce After Coldplay’s Kiss Cam Scandal: १६ जुलै रोजी, ॲस्ट्रोनॉमरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी बायरन बोस्टनमधील कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये कंपनीच्या एचआर प्रमुख क्रिस्टन कॅबोट यांना मिठी मारताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. एका वृत्तानुसार, या घटनेनंतर क्रिस्टन कॅबोट आणि त्यांच्या पतीने आता घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
ब्रिटीश बँड कोल्डप्लेच्या सादरीकरणाचा भाग म्हणून, एक किस कॅम बायरन आणि कॅबोट च्यांच्याकडे वळला, तेव्हा ते इतर कोणत्याही जोडप्याप्रमाणे उभे असलेले दिसले, यावेळी बायरनने यांनी कॅबोट यांच्या कमरेभोवती हात ठेवून उभे असल्याचे पाहायला मिळाले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर दोघांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता.
किस कॅम प्रकरण सोशल मीडियावर चर्चेत आल्यानंतर १३ ऑगस्ट रोजी एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत, क्रिस्टन कॅबोट यांनी पती अँड्र्यू कॅबोट यांच्यापासून घटस्फोटासाठी न्यू हॅम्पशायरमधील पोर्ट्समाउथ येथील न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
पण, या जोडप्याचे नाते आधीच अडचणीत होते आणि जेव्हा अँड्र्यू यांना त्यांच्या पत्नीच्या सार्वजनिक प्रेमसंबंधाबद्दल कळले तेव्हा त्यांनी याकडे दुर्लक्षित केले होते.
अँड्र्यू यांच्या माजी पत्नी ज्युलिया कॅबोट यांनी डेली मेलला सांगितले की, किस कॅमचा क्षण व्हायरल झाल्यानंतर त्यांनी अँड्र्यू यांना मेसेज केला होता, ज्यावर त्यांनी उत्तर दिले, “तिच्या आयुष्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही” आणि सांगितले होते की, ते असेही वेगळे होणार आहेत.
“तो म्हणतोय की, जरी त्यांचे लग्न झालेले होते आणि ते एकाच घरात राहत होते तरीही त्याचा पत्नीशी काहीही संबंध नाही. त्याला फक्त पैशाची काळजी आहे”, असे माजी पत्नी ज्युलिया कॅबोट म्हणाल्या.
ज्युलिया यांनी डेली मेलला सांगितले की अँड्र्यू “पती म्हणून योग्य व्यक्ती” नाही आणि क्रिस्टनबद्दलही असेच मत मांडले, “पण, ती सुद्धा पत्नी म्हणून योग्य व्यक्ती वाटत नाही.”
अँड्र्यू आणि ज्युलिया यांचे २०१४ मध्ये लग्न झाले होते. त्यांनंतर ४ वर्षांनी २०१८ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. ज्यलिया म्हणाल्या, “म्हणूनच हे घडल्यानंतर, मला बऱ्याच लोकांचे मेसेज आले. त्यामध्ये अनेकांनी, ‘हे कर्माचे फळ आहे’, असे म्हटले होते.
वैयक्तिकरित्या, मला वाटत नाही की जे घडले त्याचा अँड्र्यूवर काही परिणाम झाला असेल. मला वाटत नाही की त्याच्या भावना दुखावल्या गेल्या असतील. त्या पुढे म्हणाल्या, “तो चांगला माणूस नाही. आता त्याच्यासोबत काहीतरी वाईट घडले आहे.”