PM Narendra Modi Vadodara roadshow: भारतीय सैन्यदलातील कर्नल सोफिया कुरेशी हे नाव आता संपूर्ण भारताला परिचित झाले आहे. आता त्यांचे कुटुंबियही चर्चेत आहेत. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून आज वडोदरा येथे त्यांचा रोड शो संपन्न झाला. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबाने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. यानंतर पंतप्रधान मोदींनीही कुरेशी कुटुंबियांकडे पाहून केलेली कृती चर्चेत आहे. सोफिया कुरेशी यांची जुळी बहीण शनाया सुनसाराने याबद्दल माहिती दिली.

सोफिया कुरेशी यांचे वडील ताज मोहम्मद, आई हलिमा कुरेशी यांनी पंतप्रधान मोदींच्या रोड शो दरम्यान हजेरी लावली. ऑपरेशन सिंदूरला मिळालेल्या यशानंतर पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यासाठी या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते.

रोड शोनंतर कर्नल सोफिया कुरेशी यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, “पंतप्रधान मोदींना भेटून आम्हाला आनंद झाला. त्यांनी महिला सशक्तीकरणासाठी खूप काम केले आहे. मी स्वतः एक महिला आहे आणि मला याचा आनंद वाटतो की, पंतप्रधानांनी महिलांना पुढे आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. सोफिया माझी जुळी बहीण आहे. ती माझ्यापेक्षा १५ मिनिटांनी मोठी आहे. तिने देशासाठी खूप चांगले काम केले असून ती अनेकांसाठी आता प्रेरणा बनली असून ती माझीच नाही तर देशाची बहीण झाली आहे.”

पंतप्रधान मोदींची ‘ती’ कृती चर्चेत

शायना सुनसारा यांनी पुढे म्हटले की, पंतप्रधान मोदी जेव्हा आमच्या समोरून जात होते, तेव्हा त्यांनी माझ्या वडिलांकडे पाहून नमस्कार केला. आम्हीही त्यांना नमस्कार करून प्रतिसाद दिला. आमच्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण होता. या प्रसंगाचे वर्णन शब्दांत करणे अवघड आहे. आम्हाला असे वाटले की, पंतप्रधान मोदी संदेश देत आहेत की, ते आमच्या पाठी उभे आहेत.

शायना सुनसारा पुढे म्हणाल्या की, आपले पंतप्रधान नेहमी पुढे येऊन देशातील जनतेला आधार देत असतात. ही अभिमानास्पद बाब आहे. आजच्या रोड शोमध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एवढ्या मोठ्या मोहिमेला यशस्वी करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरच्या पत्रकार परिषदेत माझी बहीण कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग लष्करी कारवाईची माहिती देत होत्या. यातून जगाला संदेश दिला गेला की, महिला कुणापेक्षाही कमी नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
PM modi road show in vadodara
पंतप्रधान मोदींवर सोफिया कुरेशीच्या कुटुंबियांकडून पृष्पवृष्टी. (Photo – Narendra Modi / X)

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून ते दाहोद, भूज, गांधीनगर येथे हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत.