एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीला सासरी गेल्यावर आलेला धक्कादायक अनुभव तिने सांगत पती आणि सासरे यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. विशेष बाब म्हणजे तिचे सासरे प्राध्यापक आहेत. माझे सासरे माझ्यावर अश्लील टिप्पणी करतात. अश्लाघ्य शेरेबाजी करतात अशी तक्रार या सुनेने दिली आहे. लग्नानंतर १५ दिवसातच पतीने हुंडा मागण्यास आणि पैसे घेऊन ये सांगण्यास सुरुवात केली असाही आरोप तिने केला आहे. कर्नाटकच्या नेलमंगला येथील ही घटना आहे.
सुनेने पोलिसात केलेली तक्रार काय?
पीडित सुनेने तिच्या प्राध्यापक सासऱ्यांविरोधात तक्रार केली आहे. माझा लैंगिक आणि शारिरीक छळ करण्यात आला अशी तक्रार तिने केली आहे. तसंच माझे प्राध्यापक सासरे माझ्यावर अश्लाघ्य भाषेत शेरेबाजी करतात असंही तिने म्हटलं आहे. अनिताच्या आऱोपांनुसार सासरे तिला म्हणायचे “तुमच्या लग्नाला इतके महिने झाले आहेत अजून गुड न्यूज का नाही? माझा मुलगा तुझ्याशी शरीर संबंध ठेवत नाही का? तो ठेवत नसेल तर सांग मी तुझ्याशी शरीर संबंध ठेवतो.” “मॉडर्न मुलींप्रमाणे अर्धे कपडे घालून माझ्या समोर ये.” या आणि अशा प्रकारची शेरेबाजी सासरे करत होते. तसंच माझ्या पतीने माझा शारिरीक आणि मानसिक छळ केला अशी तक्रार या विवाहितेने केली आहे.
पीडित महिलेचं लग्न कधी झालं?
२ नोव्हेंबर २०२३ ला प्राध्यपकाच्या मुलाशी पीडित तरुणीचं लग्न झालं. या लग्नात माजी पोलीस अधिकारी असलेल्या वडिलांनी २५ लाख रुपये खर्च केले. त्यात सोन्या चांदीचे दागिने आणि इतर खर्चांचा समावेश होता. लग्नानंतर अवघ्या १५ दिवसातच माझ्या पतीने माहेरच्या संपत्तीत वाटा मागण्यास सुरुवात केली आणि घरुन पैसे घेऊन ये म्हणून दबाव टाकला. तसंच तू वडिलांकडून मोठी रक्कम घेऊन ये म्हणले नर्सिंग होम सुरु करता येईल असं पतीने तिला बजावलं होतं. पती माझा शारिरीक आणि मानसिक छळ करत होता असंही या पीडितेने म्हटलं आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे. पीडित महिलेचा पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
सासरे अश्लील शेरेबाजी आणि शारिरीक छळ करत होते, सुनेचा आरोप
पोलिसांकडे जी तक्रार देण्यात आली त्यानंतर पीडित महिलेचे सासरे, सासू आणि पती यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. सासऱ्यांची अश्लील शेरेबाजी जेव्हा या तरुणीने नवऱ्याला आणि सासूला सांगितली तेव्हा त्यांनी जाऊ दे ते आपल्या घरातलेच आहेत विषय सोडून दे आणि अॅडजेस्ट कर असं तिला सांगितलं. ही गोष्ट मला असह्य झाल्याने मी पोलिसांत धाव घेतली असंही सदर पीडितेने सांगितलं आहे. माझे सासरे माझा शारिरीक छळ करत होते असाही आरोप या पीडितेने केला आहे.
