भारतीय वैज्ञानिकांनी संगणकावरील काही संशयास्पद कृती अगोदरच लक्षात घेऊन मालवेअरला नष्ट करणारे देखरेख सॉफ्टवेअर शोधून काढले आहे.
बॉटनेट हे संगणकांचे असे जाळे आहे ज्यात झोंबीज नावाचे मालवेअर असते व त्यामुळे तिसऱ्याच व्यक्तीला तुमच्या संगणकाचा ताबा प्राप्त करणे शक्य होते. अशाप्रकारे गैरयंत्रणा ज्यांच्यावर येतात असे संगणक ओळखण्यासाठी १९६६ मध्ये सांख्यिकीय साधने वापरली जात असत, असे कोईमतूर येथील पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीने म्हटले आहे.
या संस्थेने मालवेअर नष्ट करण्यासाठी केलेले संशोधन हे इंटरनॅशनल जर्नल ऑफ इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी अँड डिजिटल फोरेन्सिक या संस्थेच्या वैज्ञानिकांनी केले आहे. त्यांच्या मते जगात दररोज लाखो संगणक मालवेअरमुळे बंद पडतात. फिशिंग अ‍ॅटॅक व अ‍ॅँटीव्हायरस सॉफ्टवेअरबाबत जनजागृती झालेली असतानाही मालवेअर येतात. सुरक्षा व आज्ञावली कंपन्यांनी यावर उपाय म्हणून इंटरनेटवरील हालचालींवर लक्ष ठेवून बॉटनेट नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले, पण नंतर मालवेअर तयार करणाऱ्यांनी पुन्हा नवी साधने व तंत्रे विकसित केली, त्यामुळे असुरक्षित संगणकात मालवेअरचे रूपातील बॉटनेट पुन्हा तयार होऊ लागले.  
संशोधक आर.अनिता व पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थांमधील त्यांच्या सहकाऱ्यांनी हिडन सेमी मारकोव मॉडेल नावाचे साधन शोधून काढले असून, त्यामुळे मालवेअरचा धोका निर्माण करणाऱ्या संगणकावरील बॉटनेट हालचालींवर लक्ष ठेवता येते.  
संभाव्यता व सांख्यिकी सिद्धान्तानुसार मारकोव ही अशी प्रक्रिया आहे, की ज्यात एखाद्या संगणकीय प्रक्रियेचा पूर्वेतिहास माहिती नसतानाही त्याची पुढची अवस्था काय असू शकेल याचा अंदाज केला जातो. हिडन मारकोव मॉडेल (प्रारूप) हे काही चलांचे बनलेले आहेत जे निरीक्षकाला समजत नाहीत, पण ते हस्तक्षेप करून मालवेअरचा धोका नष्ट करू शकतात.  
जेव्हा आपल्याला बाहेर पडायचे असेल तर हवामानाचा अहवाल बघूनच आपण बाहेर पडतो त्यात हिडन मारकोव पद्धतच वापरलेली असते. या प्रारूपातील संभाव्यतेचा हाच नमुना वापरलेला असतो व सेमी मार्कोव पद्धतीत सध्याच्या स्थितीवरून पुढील स्थितीचा अंदाज घेतला जातो.  
संशोधकांनी हिडन सेमी मार्कोव मॉडेलमध्ये कुठले संगणक झोंबी प्रकारात येऊ शकतात हे बॉटनेट आधारित मॅनेजमेंट इनफॉर्मेशन बेसच्या मदतीने (एमआयबी) सांगण्याची व्यवस्था केली. हे चल घटक म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉलच्या मदतीने माहितीचे पॅकेट्स नियंत्रित करणारे संगणकातील घटक असतात. माहितीचे पॅकेट्स संगणकात येत असतात व बाहेरही जात असतात.
एका छोटय़ा झोंबी कॉम्प्युटर नेटवर्कवर केलेल्या प्रयोगात लाइटवेट अँड रिअर टाइम डिटेक्शन सिस्टीम यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले. मोठय़ा प्रमाणावर त्याचा वापर केला तर बॉटनेटला आळा बसून झोंबी संगणक सायबर गुन्हेगारांकडून ताब्यात घेतले जाऊन मालवेअर सोडण्याचे प्रकार कमी होऊ शकतील असे त्यांचे म्हणणे आहे.