इस्लामाबाद : पाकिस्तानच्या उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांसह बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी जनरल रावत यांच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

पाकिस्तानचे चेअरमन ऑफ जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी (सीजीसीएससी) जनरल नदीम रझा आणि लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी जनरल रावत यांच्या मृत्यूबाबत शोकसंवेदना व्यक्त केल्या असल्याचे पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या एका लघु निवेदनात म्हटले आहे.

पाकिस्तान हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अहमद बाबर सिद्धू यांनी जनरल रावत यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला असल्याचे हवाई दलाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जनरल रावत यांच्या दुर्दैवी मृत्यूचे वृत्त कळल्यामुळे आम्हाला धक्का बसला, असे बांगलादेशच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ढाका येथे सांगितले. बांगलादेशाने आपला मोठा मित्र गमावला आहे. भारतीय लोक व शोकाकुल कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असेही मंत्रालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे.