तीस्ता सेटलवाड यांनी गुजरात सरकार पाडण्यासाठी आणि पंतप्रधान मोदींना अडकवण्यासाठी जे काही केले ते काँग्रेसच्या इशाऱ्यावर केले. २००२ साली नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रचण्यात आलेल्या कटामागे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा हात असल्याचा आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला होता. काँग्रेसने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

हेही वाचा- श्रीलंकेतील संकटासाठी करोना टाळेबंदी कारणीभूत; माजी अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांचा राजीनामापत्रात दावा

गुजरात बदनाम करण्याचा सोनिया गांधीचा डाव

सोनिया गांधी यांनी गुजरात बदनाम करण्यासाठी आणि नरेंद्र मोदींना कोंडीत पकडण्यासाठी षडयंत्र रचले असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता. तसेच गुजरात दंगलीनंतर भाजपा सरकार पाडण्यासाठी एका मोठा कट रचण्यात आला होता. हा कट काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या सांगण्यावरुन रचण्यात आला होता, असा दावा अहमदाबाद पोलिसांनी गुजरात दंगल प्रकरणात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. या कटात तीस्ता सेटलवाड यांचा देखील समावेश होता, असा आरोपही गुजरात पोलिसांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा- देशाच्या विकासासाठी ‘रेवडी संस्कृती’ घातक!; पंतप्रधान मोदींची टीका : मतांसाठी मोफत योजना राबवणारे लक्ष्य

एसआयटीचा अहवाल खोटा

एसआयटीनेही या कटामागे सोनिया गांधीचा हात असल्याचा अहवाल सादर केला होता. हा अहवाल खोटा असून मुद्दाम तयार करण्यात आल्याचा दावा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे. तसेच हे तपास पथक विशेष निर्देश दिलेले पथक दिसत असल्याचा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केला आहे.

अहमद पटेल यांच्या मृत्यूच्या २० महिन्यांनंतर त्यांच्यावर कट रचल्याचा आरोप करणे हा राजकीय प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सूडबुद्धीचा भाग आहे. सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरुन अहमद पटेल यांनी कट केल्याचा आरोप करणे चुकीचे असल्याचे ट्वीट पी चिदंबरम यांनी केले आहे.