पीटीआय, डेहराडून

काँग्रेस आमदाराने रामलल्लाच्या रंगावरून प्रश्न उपस्थित केल्यानंतर उत्तराखंड विधानसभेत मोठा गोंधळ उडाला. विधानसभेत समान नागरी कायद्यासंदर्भात चर्चा सुरू होती. यावेळी काँग्रेस आमदाराने रामलल्लाच्या रंगावरून प्रश्न उपस्थित केल्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले.

Jayant Chowdhury told the workers the reason
भाजपाशी हातमिळवणी करण्याचं जयंत चौधरींनी कार्यकर्त्यांना सांगितलं कारण; म्हणाले, “भारतरत्न हा…”
महायुतीत सहभागी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार व काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांच्या भेटीने चर्चेला उधाण (संग्रहित छायाचित्र)
महायुतीत सहभागी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार व काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांच्या भेटीने चर्चेला उधाण
Sudhir Mungantiwar
मोले घातले लढाया: अनिच्छेने दिल्लीच्या लढाईत
गडकरी म्हणाले, “आम्ही संविधानाच्या विरोधात असतो तर दीक्षाभूमीचा…”

काँग्रेस आमदार आदेश सिंह चौहान यांनी रामलल्ला यांच्यावर केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला. विधानसभेत समान नागरी कायद्यावर चर्चा अधिक न होता, यावर जोरदार खडाजंगी उडाली. चौहान म्हणाले, मी धर्मग्रंथात जेवढे वाचले आहे, त्यात आमचे प्रभू राम हे सावळय़ा रंगाचे होते. पण त्यांनी (भाजप) अयोध्येतील रामलल्लाची मूर्ती ‘काळय़ा’रूपात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप केल्याने वादाला तोंड फुटले आणि गोंधळ उडाला.

हेही वाचा >>>शरद पवार गटाला नावासाठी पुन्हा अर्ज करावा लागणार? नेमकं कारण काय? प्रफुल्ल पटेल म्हणाले…

काँग्रेस आमदाराच्या विधानावर बोलताना यावेळी संसदीय कामकाजमंत्री प्रेमचंद्र अग्रवाल म्हणाले, हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे की, (त्यांच्या काळात) व्होट बँक आणि ध्रुवीकरणामुळे समान नागरी कायदा घेतला गेला नाही. यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली. यावेळी अग्रवाल म्हणाले, हे सहन केले जाणार नाही. यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी जय श्री रामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.संसदीय कामकाज मंत्री प्रेमचंद अग्रवाल आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी काँग्रेस सदस्याला फक्त समान नागरी कायदा विधेयकावर बोलण्यास सांगितले.

‘तुम्ही प्रभू राम यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणे बंद केले पाहिजे,’ असे ते म्हणाले. त्याच वेळी काँग्रेसचे वर्णन रामाचे अस्तित्व नाकारणारा पक्ष असे केल्याने वादात आणखी भर पडेल. सभापती रितू खंडुरी यांनी हस्तक्षेप केल्यानंतर विधानसभेचे कामकाज पुढे सुरू झाले.