भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती कार्यक्रमाची सुरुवात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील महू येथून होईल. काँग्रेसतर्फे वर्षभर यानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. महू हे आंबेडकरांचे जन्मस्थान आहे.
दोन जून रोजी आंबेडकर कोलंबिया विद्यापीठातून पदवीधर झाले. त्याचेही हे शताब्दी वर्ष आहे. १४ एप्रिलला आंबेडकर जयंतीदिनीच काँग्रेसकडून या कार्यक्रमाची सुरुवात केली जाणार होती. मात्र राहुल सुटीवर हा कार्यक्रम त्यावेळी रद्द करण्यात आला होता.
महू येथे आंबेडकर स्मारकात आदरांजली वाहिल्यानंतर राहुल यांची जाहीर सभा होईल. त्यानंतर काही स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतील. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर दलित समाजाचा विश्वास संपादन करण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न मानला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress celebrate ambedkar jayanti year
First published on: 02-06-2015 at 02:27 IST