काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना 2015 च्या एका देशद्रोहाच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री त्यांना अहमदाबाद जिल्ह्याच्या विरमगाव येथून अटक करण्यात आली. देशद्रोहाच्या प्रकरणात पटेल यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या एका न्यायालयाने हार्दिक पटेल यांच्याविरोधात शनिवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. सुनावणी दरम्यान हार्दिक पटेल सातत्याने अनुपस्थित राहिल्यामुळे अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याची माहिती आहे. हार्दिक पटेलला आज न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पाटीदार आरक्षण समर्थनार्थ 25 ऑगस्ट 2015 रोजी हार्दिक पटेल यांनी अहमदाबाद येथे एक रॅली काढली होती. त्यानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला. त्यावेळी पोलिसांनी हिंसाचाराप्रकरणी हार्दिक आणि सहकाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader hardik patel arrested for evading sedition case trial in ahmedabad sas
First published on: 19-01-2020 at 08:50 IST