बंगळुरू : येथील कॉंग्रेसचे नेते  मुकर्रम खान यांनी हिजाबप्रकरणी प्रक्षोभक विधाने केल्याच्या आरोपाखाली त्यांना कलबुर्गी जिल्हा पोलिसांनी मंगळवारी त्याला हैदराबाद येथून ताब्यात घेतले. त्यांना लवकरच न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. मुकर्रम खान यांचा एक चित्रफीत समाजमाध्यमांद्वारे सर्वत्र पसरली असून, त्यात त्यांनी,  ‘‘जो कोणी हिजाबला विरोध करेल त्याचे तुकडे तुकडे केले जातील,’’ असे प्रक्षोभक विधान केल्याचे दिसत आहे. त्यांच्याविरुद्ध सेदाम पोलीस ठाण्यात प्राथमिक तपास अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे.  कथित चित्रफितीत खान म्हणाले, की आम्ही भारतातच जन्मलो आणि वाढलो व येथेच आपल्या सर्वाचा अंत होणार हे निश्चित असते. हिजाब घालण्यास विरोध करणाऱ्यांचे तुकडे केले जातील. सर्व जात-धर्म येथे समान आहेत. कोणत्याही धर्म-जातीवर अन्याय होता कामा नये.