केंद्र सरकारने चीनबाबत डीडीएलजे धोरण अवलंबले असल्याची टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे. “नकार द्या (Deny), विचलित करा ( Distract), खोटे बोला ( Lie), सिद्ध करा (Justify), हेच मोदी सरकारचे धोरण असल्याचे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
जयराम रमेश यांनी ट्वीट करत म्हटले, ” चीन सोबत पंतप्रधान मोदी यांनी डीडीएलजे नीती अवलंबली आहे. नकार द्या (Deny)- चीनने आपल्या भूमीवर कब्जा केला. मात्र, मोदी यांनी हे मान्य केलं नाही. विचलित करा ( Distract)- चीनी सैन्याने भारतात घूसखोरी केली. मात्र, रक्षा मंत्रालयाने रिपोर्ट लपवले. खोटे बोला ( Lie) – आपल्या सीमेत कोणीही प्रवेश केला नाही, अशा प्रकारचे खोटे सरकारकडून सांगण्यात आले. सिद्ध करा (Justify)- चीनचा विरोध न करता, व्यापार वाढवला”, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत “आपली एक इंचही जमीन” सोडणार नाही. दोन्ही देशातील सीमावाद चर्चेतून सोडवला जाईल, असे वक्तव्य केले होते. तसेच काँग्रेस सत्तेवर असताना भारत जीन युद्धात भारताला मोठा धक्का बसला होता. मात्र, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार कोणत्याही किंमतीवर देशाच्या स्वाभिमानाशी आणि प्रतिष्ठेशी तडजोड करणार नाही, असेही ते म्हणाले होते.
हेही वाचा – संसदेच्या नवीन इमारतीवरील अशोक स्तंभाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण; जाणून घ्या कसा आहे हा अशोक स्तंभ?