भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या वडोदरा मतदार संघातील पोस्टरवर काँग्रेसचे पोस्टर चिटकविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी काँग्रेसचे उमेदवार मधुसूदन मेस्त्री यांना अटक केली आहे.
त्यांच्यासोबत उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वडोदरा मतदार संघात प्रचार करत असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क आपल्या उमेदवारालाच खांद्यावर चढवून मोदींच्या पोस्टरवर स्वत:चा पोस्टर चिटकविण्यास प्रवृत्त केले. उमेदवार मधुसूदन मेस्त्री यांनीही परिस्थितीच्या गरमागरमीत कार्यकर्त्यांच्या सहाय्याने मोदींच्या पोस्टरवर स्वत:च्या प्रचाराचे पोस्टर चिटकविले. मोदींचे पोस्टर फाडण्याचाही प्रकार घडला. सदर परिस्थितीची माहिती मिळताच  पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि मधुसूदन यांच्यासह कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले.