भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात मागच्या नऊ दिवसांपासून महिला कुस्तीगीर हे दिल्लीतल्या जंतरमंतर या ठिकाणी आंदोलन करत आहेत. त्यांना पुरुष मल्लांची साथ लाभली आहे. बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा ठपका या सगळ्यांनी ठेवला आहे. तसंच त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशीही मागणी या सगळ्यांनी केली आहे. या सगळ्या मल्लांना देशभरातून पाठिंबा मिळतो आहे. नुकतीच प्रियंका गांधींनी त्यांची भेट घेतली होती. त्यापाठोपाठ आज काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांनीही या कुस्तीगीर आंदोलकांची भेट घेतली.

काय म्हटलं आहे सिद्धू यांनी?

तुम्हाला जर न्याय मिळाला उशीर झाला तर मी माझ्या प्राणांची बाजीही लावेन असं म्हणत नवजोत सिंग सिद्धू यांनी कुस्तीगीरांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. जर सत्य काय आहे ते जाणून घ्यायचं असेल तर कस्टोडियल इनव्हेस्टिगेशन आवश्यक आहे. जर असं झालं नाही तर काय अर्थ आहे? कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे मग असं करून आपण समाजात प्रतिष्ठा असलेल्या व्यक्तींना काही वेगळा नियम लावणार का? असाही प्रश्न सिद्धू यांनी विचारला आहे. सर्वात आधी तर बृजभूषण सिंह यांनी राजीनामा द्यायला हवा असंही सिद्धू यांनी म्हटलं आहे. आपण या आंदोलनात सहभागी होणार हे सिद्धू यांनी ट्वीट करुनही सांगितलं होतं.

ट्वीटमध्ये काय म्हटलं होतं सिद्धू यांनी?

कुस्तीगीर महिला आरोप करत आहेत तरीही या प्रकरणात अद्याप FIR करायला विलंब का लागला? तसंच ही एफआयआर सार्वजनिकही करण्यात आली नाही. बृजभूषण सिंह यांना नेमकं का वाचवलं जातं आहे? असेही प्रश्न सिद्धू यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये विचारले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या प्रकरणात ब्रिजभूषण यांच्याविरोधात दोन गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. मागच्या ९ दिवसांपासून महिला कुस्तीगीर आंदोलन करत आहेत. न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी केली आहे.