लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या काँग्रेसला आता लोकसभेत मागच्या बाकावरच बसावे लागणार आहेत. संसदीय नियमांनुसार काँग्रेसच्या खात्यात एकूण सदस्यसंख्येच्या एक दशांश सदस्यसंख्या नसल्याने काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदावर दावा करता येणार नसल्याचा निर्वाळा अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी शुक्रवारी दिला. विरोधी पक्षनेतेपदावरून निर्माण झालेल्या गुंत्यामुळे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी रोहतगी यांच्याकडे सल्ला मागितला होता. राजीव गांधी यांच्या काळात काँग्रेसला ४०० जागा मिळाल्या असताना त्यावेळी तेलुगु देसमला विरोधी पक्षनेतेपद नाकारताना हाच नियम लावण्यात आला होता.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jul 2014 रोजी प्रकाशित
विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे नाहीच
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या काँग्रेसला आता लोकसभेत मागच्या बाकावरच बसावे लागणार आहेत.

First published on: 26-07-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress not eligible for lop post says attorney general rohatgi